Headlines

Raj Thackeray in Thane Court Over 2008 Railway Protest; Claims No Involvement



2008 सालच्या रेल्वे भरती आंदोलनाप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे न्यायालयात हजर झाले होते. यावेळी राज ठाकरेंसह या प्रकरणातील इतर सहा आरोपींचीही उपस्थिती होती. सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांचा जबाब नोंदव

.

सन 2008 मधील रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या, असा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना केलेली मारहाण आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या नुकसानीप्रकरणी आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. या आंदोलनादरम्यान परप्रांतीयांना लक्ष्य करणे आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्या संदर्भात आज न्यायालयीन कामकाज झाले.

न्यायालयात नेमके काय घडले?

आंदोलन प्रकरणात राज ठाकरे सोडून इतर मनसे कार्यकर्त्यांवर जे आरोप आहेत, त्याबद्दल न्यायाधीशांनी जबाब वाचून दाखवले. उत्तर भारतीय परिक्षार्थींना मनसे कार्यकर्त्यांनी लाठ्या-काठ्याने मारहाण केली, या मारहाणीत परिक्षार्थींना मार लागला, ते जखमी जाले होते, असे न्यायाधीशांनी जबाबात वाचून दाखवले. त्यानंतर साक्षीदारांचेही जबाब वाचून दाखवण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी न्यायालयात स्पष्ट केले की या गुन्ह्याशी माझा काहीही संबंध नाही. आंदोलनावेळी मी नाशिकला होतो, असे ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची यापूर्वीची सुनावणी डिसेंबर महिन्यात पार पडली होती, ज्यामध्ये आपल्याला हा गुन्हा कबूल नसून न्यायालयीन प्रक्रियेला आपण पूर्णपणे सहकार्य करू, अशी भूमिका राज ठाकरे यांनी न्यायालयात मांडली होती; त्यानंतर आज पुन्हा एकदा या प्रकरणाची पुढील सुनावणी पार पडली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *