दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत “दगडावरील पायाचे ठसे आधार कार्डशी लिंक करून ओळख पटवली जाईल,” असा अजब दावा करणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आता राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे. विरोधकांसोबतच महायुतीतील घटक प
.
धंगेकरांचे ट्विट- ‘दगडावरचे फिंगरप्रिंट आधारला लिंक करून दाखवा’
रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून चंद्रकांत पाटील यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, “वाय झेड सिक्युरिटी असलेल्या माणसाची बुद्धिमत्ता वाय झेड झाल्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे चंद्रकांतदादा..! अतिशय बुद्धिमान वैज्ञानिकांना सुद्धा प्रश्न पडावा अशी तल्लख बुद्धी चंद्रकांतदादांना लाभली आहे. आमच्या पुणेकरांचे भाग्य आहे की असा आमदार आम्हाला लाभला आहे आणि त्याहून मोठे भाग्य आपल्या राज्याचं आहे की अशी व्यक्ती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहे.माझी विनंती आहे चंद्रकांतदादांनी दगडावरचे फिंगरप्रिंट आधार कार्डला लिंक करून दाखवावे, नाहीतर दादांचा सुद्धा राजीनामा घ्यायला काही हरकत नाही. आपल्या मुलांच्या भवितव्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही.”
भोंदू खरातचं दर्शन घेतल्यापासून दादांची बुद्धी भ्रष्ट
माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांवर आणखी कठोर शब्दांत निशाणा साधला. “हे कोल्हापूरचं पार्सल आहे. पुढच्या वेळेस ते पुण्यात राहतील की नाही माहिती नाही, पण ते पुण्याची वाट लावून जाणार आहेत. ते अतिशय कपटी आणि दुष्ट आहेत.लिंगपिसाट आणि भोंदू असलेल्या अशोक खरातचं दर्शन घेतल्यापासून चंद्रकांतदादांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे,” अशी खोचक टीकाही धंगेकरांनी केली.
चंद्रकांत पाटलांच्या फिंगरप्रिंटच्या दाव्याचा समाचार घेताना धंगेकर म्हणाले, “पुणे पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांचे ऑफिस तपासावे, तिथे कुख्यात गुंड निलेश घायवळचे फिंगरप्रिंट मिळतील. विद्यार्थ्यांचे आंदोलन आता शांत झाले आहे. अशा वेळी पुन्हा अशी विधाने करून विषय चिघळवणे योग्य नाही. पक्षापेक्षाही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि जनतेशी आत्मीयता असणे गरजेचे असते,” असेही त्यांनी सुनावले.
संजय राऊतांचाही टोला: ‘देश मोठ्या संशोधकाला मुकेल’
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. “चंद्रकांतदादांनी दगडावरचे ठसे आधारला लिंक करण्याचे अनोखे संशोधन केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली पाहिजे आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू केले पाहिजे. त्यांना हा पुरस्कार दिला नाही, तर देश एका मोठ्या संशोधकाला मुकेल,” असा टोला राऊतांनी लगावला. तसेच दादांचा दगडाशी फार जुना आणि जवळचा संबंध असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.
चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले होते?
सांगली येथील पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली पोलीस आणि एका पत्रकाराच्या युट्यूब व्हिडिओचा हवाला देत एक दावा केला होता. “जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या पायाचे आणि हाताचे ठसे तिथे पडलेल्या दगडांवर उमटले आहेत. ते ठसे आता आधार कार्डशी लिंक करून या विद्यार्थ्यांची आणि आंदोलकांची ओळख पटवली जाणार आहे, असा दिल्ली पोलिसांचा ॲडव्हान्स तपास आहे,” असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या याच विधानावरून आता राजकीय वातावरण तापले असून त्यांच्यावर सर्व थरांमधून टीकेची झोड उठली आहे.
हेही वाचा…
दिल्लीतील दगडांवरील ठसे आधारशी लिंक होतील!:चंद्रकांत पाटलांचा पोलिसांच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या तपासाबाबत दावा; अभिजीत दीपकेंनाही दिला सल्ला

दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलकांवरील लाठीचार्ज व पॅलेट गन हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी दिल्ली पोलिसांच्या ‘ॲडव्हान्स तपासा’बाबतही दावा केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू:4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

भिवंडीमध्ये गुरुवारी मध्यरात्री एक चार मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, 4 ते 5 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी