![]()
विदर्भात मान्सून सक्रिय झाला असून, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरने २८ ते ३१ जुलै २०२६ दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत काही ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्य
.
२९ जुलै रोजी चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट असून, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट असेल.
३१ जुलै रोजी अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, वाहतूक कोंडी होणे आणि कच्च्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी रस्त्यांची माहिती घ्यावी आणि पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने पावसाच्या तीव्रतेनुसार त्याचे वर्गीकरण केले आहे. २४ तासांत ०.१ ते २.४ मिमी पाऊस ‘खूप हलका’, २.५ ते १५.५ मिमी ‘हलका’, १५.६ ते ६४.४ मिमी ‘मध्यम’ पाऊस मानला जातो.
६४.५ ते ११५.५ मिमी पाऊस ‘जोरदार’ (Heavy Rain), ११५.६ ते २०४.४ मिमी ‘खूप जोरदार’ आणि २०४.५ मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस ‘अत्यंत जोरदार’ या श्रेणीत मोडतो.