Headlines

Rs 1.19 Lakh Seized, Six Booked



हिंगोली शहरातील गणेशवाडी शिवारात विटभट्टीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगोली शहर पोलिसांनी सोमवारी ता. 22 सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा एकूण 1 लाख 19

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी छापासत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी स्थानिक पोलिस ठाण्यासह गुन्हे शाखेचे पथकही स्थापन केले आहे. या पथकाकडून अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत.

दरम्यान, हिंगोली शहरातील गणेशवाडी शिवारात विटभट्टीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, शंकर ठोंबरे, गणेश लेकुळे, संतोष करे, जोगे, जमादार शेख मोहसीन यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा 1.19 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी जामदार शेख मोहसीन यांच्या तक्रारीवरून मधुकर शिंदे, बंडू घडाळे, अजय होकर्णे, मनिष भगत, गुलाम अकबर, सतीष लोखंडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार शेख मोहसीन पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, शहरात कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाही, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी दिला आहे. नागरीकांनीही अवैध व्यवसायाची माहिती पोलिस प्रशासनाला देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *