- Marathi News
- National
- Shrapnel Hits Protesting Youth In The Eye; Vision In Danger, Both Police And Protester Injured
नवी दिल्ली3 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

नीट पेपर लीकविरोधात २० जुलै रोजी काढण्यात आलेल्या ‘संसद चलो’ मार्चमध्ये जखमी झालेल्या १९ वर्षीय साहिल लोचब याच्या उजव्या डोळ्याची दृष्टी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. निदर्शनांदरम्यान त्याच्या डोळ्यात, चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीत छर्रे लागल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. साहिलच्या डोळ्यावर एक शस्त्रक्रिया झाली असून, दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतरच त्याची दृष्टी परत येईल की नाही हे स्पष्ट होईल.
शुरुवातीला डॉक्टरांनी दृष्टी परत येण्याची शक्यता केवळ १% वर्तवली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एका छऱ्र्यामुळे कॉर्नियाला छिद्र पडले आहे, तर दुसरा छर्रा फुफ्फुस आणि हृदयाच्या आसपासच्या भागात आढळला आहे. याप्रकारामुळे विद्यार्थी संघटना संतप्त झाल्या आहेत. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांना पेलेट गनचा वापर केल्याचा नकार दिला आहे.
चकमकीत एसीपींच्या डोक्याला लागला दगड
जंतर-मंतरवर निदर्शनादरम्यान झालेल्या चकमकीत एसीपी जय प्रकाश यांच्या डोक्याला दगड लागल्याने फ्रॅक्चर झाले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी आंदोलनकर्त्यांची संख्या ५ ते ६ हजारांपर्यंत पोहोचली होती. पोलिसांनी बंदी घातलेल्या भागाकडे जाणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी मानवी साखळी तयार केली होती, तेव्हा सुमारे ५०० लोकांनी दगडफेक आणि पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. जखमी एसीपींना सहकारी पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणाहून बाहेर काढून राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास सुरू केला आहे. अनेक ठिकाणचे फुटेज तपासून आंदोलनात उपद्रव माजवणाऱ्यांचा शोध पाेलिस घेत आहेत.