![]()
महिलांच्या बाबतीत गंभीर गुन्हे, अपराधांची सुरुवात पाठलाग आणि डिजिटल पाठलागाने होते. महिलांचा सायबर पाठलाग या विषयावर राष्ट्रीय महिला आयोग राज्यातील महिला आयोगांच्या सहकार्याने विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेणार असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. महिलांची सुरक्षा ही सामूहिक जबाबदारी असून त्यांच्या तक्रारीकडे संवेदनात्मक भूमिकेतून पाहिले जावे, असे आवाहनही त्यांनी केले. यशदा येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या समन्वयाने आयोजित पाठलाग आणि सायबर पाठलाग (स्टॉकिंग आणि सायबर स्टॉकिंग) प्रतिबंध विषयावरील जनजागृती कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. महिलांना तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागत नाही. त्यासाठी झिरो एफआयआर (प्रथम खबरी अहवाल) दाखल करता येतो, असेही त्या म्हणाल्या. महिला आयोग पाठीशी सूर्यास्तानंतर महिलांना पोलिस ठाण्यामध्ये बोलावण्यावर कायदेशीर मर्यादा आहेत. महिला पोलिस अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला गेला पाहिजे, सायबर गुन्ह्याबाबत कायद्यामध्ये कठोर तरतुदी आहेत, याबाबी देखील महिलांना माहिती असणे आवश्यक आहे. सर्व शासकीय व शासकीय संस्था कार्यस्थळे या ठिकाणी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. असे सांगून महिलांच्या संरक्षणासाठी, हक्कासाठी राष्ट्रीय महिला आयोग कायम त्यांच्या पाठीशी राहील असेही त्यांनी या वेळी सांगितले.
Source link
महिलांनी न घाबरता ‘झीरो एफआयआर’ नोंदवावा:राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रहाटकरांचे आवाहन