![]()
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा फेब्रुवारी- मार्च परीक्षेप्रमाणेच पुरवणी परीक्षेचे वेळापत्रकही १५ दिवस आधी केले आहे. १६ जूनपासून या परीक्षेला सुरुवात ह
.
पुरवणी परीक्षेसाठीची अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. बारावीची लेखी परीक्षा १६ जून ते ८ जुलैदरम्यान होणार आहे. याच वेळेत प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा होईल. दहावी प्रमाणपत्र परीक्षा १६ ते ३० जून असेल. या तारखांदरम्यान प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा असेल, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी सांगितले. या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahah sscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दरम्यान,
गेल्यावर्षी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला होता. प्रवेशाच्या ११ फेऱ्या झाल्या होत्या. प्रवेशाची प्रक्रिया ९ महिने सुरू होती. अकरावीचे वर्ग सुरू असतानाही प्रवेश देण्यात येत होते. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. गेल्या वर्षीप्रमाणे उशीर होऊ नये म्हणून यंदा राज्य मंडळाने परीक्षा व निकाल लवकर घेण्याचे नियोजन केले आहे.
दहावी, बारावीच्या निकालात वाढ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक सत्र २०२५-२६ चा दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार, ८ मे रोजी, तर २ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९०.७४ टक्के, तर बारावीचा ९०.१४ टक्के लागला. दोन्ही निकालात यंदा वाढ आहे. यंदा जिल्ह्यातून दहावीच्या २५ हजार ४१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २३ हजार ०६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर बारावीमध्ये २४ हजार ७२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी २२ हजार २८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अनुत्तीर्ण दहावी, बारावीचे विद्यार्थी १६ जूनपासून होणाऱ्या पुरवणी परीक्षेला प्रविष्ट होतील.