![]()
तालुक्यातील वडनेर गंगाई या ग्रामीण भागातील जनतेला आता दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. गावात प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (पीचसी) जागेची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पारिसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. राज्यसभा खा.डॉ.अनिल बोंडे यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकल्पाकडे विशेष लक्ष दिले आहे. या स्थळ पाहणीच्या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पवार (देवके), डॉ.संजय पाटील, डॉ.कार्तिक पवार, तलाठी स्वाती पांडे, नवल चव्हाण, रघुनाथ खलोकार, माला डोईफोडे, नकुल सोनटक्के, शुभम बायस्कार, विशाल माहुलकर, ऋषिकेश इंगळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडनेर गंगाई परिसरातील ग्रामस्थांना आतापर्यंत अगदी साध्या आजारांसाठीही दर्यापूर किंवा अमरावतीला धाव घ्यावी लागत होती. वेळेवर आरोग्य सेवा न मिळाल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र होत असल्याने वडनेर गंगाई व परिसरातील गावांच्या हजारो नागरिकांना गावातच दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. माता व बाल संगोपन, लसीकरण, सामान्य आजारांवरील उपचार यांसाठी आता दूर जाण्याची गरज राहणार नाही. स्थळपाहणी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास व राज्य आरोग्य विभागाला सादर केला जाईल. आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटेल प्रशासकीय मंजुरी व निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. पालकमंत्री बावनकुळे यांचे या प्रकल्पावर विशेष लक्ष असल्याने प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने होईल अशी अपेक्षा आहे. लवकरच वडनेर गंगाईत पीचसी चे काम सुरू होईल व आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Source link
उपचारांसाठी पायपीट थांबणार, ‘पीचसी’च्या हालचालींना वेग:प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी