![]()
शहरात गत तीन दिवसांपासून अकोलेकरांना दिवसासह रात्रीही असह्य उकाडा व गरम झळांचा सामना करावा लागत आहे. यामागे हवामानाचा बदललेला पॅटर्न व वाढते शहरीकरण हे प्रमुख कारण आहे. सिमेंट काँक्रीटची बांधकामे दिवसा उष्णता शोषून रात्री हळूहळू बाहेर सोडत असल्याने रात्री उशिरापर्यंत ३१ अंशांवर तापमान रहात असून पहाटेपर्यंत उकाडा जाणवत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात १९ तारखेपर्यंत वॉर्म नाईट आणि २१ तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. कुलर, फॅन, वातानुकूलन यंत्राचा वापर वाढल्याने विजेवरील दाब प्रचंड वाढला आहे. त्यामुळे रात्री कमी दाबाने विद्युतपुरवठा होत असून फॅन व कुलर धीम्या गतीने चालत असल्याने उकाड्यातून दिलासा मिळणे दुरापास्त झाले आहे. अकोल्याचे कमाल तापमान ३ दिवसंापासून ४५ अंशांवर पार आहे. बुधवार व गुरुवारी शहराचे तापमान ४५.९ अंश तर शुक्रवारचा पारा ४५,४ अंशांवर राहिला तसेच किमान तापमान ३१.५ अंश नोंदवले गेले. परंतु चिंताजनक बाब म्हणजे रात्रीचे (किमान) तापमानही ३२ अंशांवर रहात आहेत. बुधवारी कमाल तापमान ३२.५ अंश तर गुरुवारी ते ३१.५ होते आणि शुक्रवारी ते ३१.५ अंशांवर आहे. उर्वरित पान ४ प्रा. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. Q. अकोल्यासह अमरावतीचे तापमानही अधिक का? A : उष्ण वारे राजस्थान व गुजरातकडून निघून जळगावपासून सुरू होऊन अकोला, यवतमाळ, वर्धा मार्गे चंद्रपूरपर्यंत येतात आणि तेथे थांबतात. अकोला उष्ण वाऱ्यांवर मार्गावर असून तेथूनच त्यांचा विदर्भात प्रवेश होतो. यावर्षी बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या दबावामुळे हा मार्ग बदलला. उष्ण वारे चंद्रपूर व नागपूरकडे न जाता अमरावती, वर्धा व यवतमाळकडे डायव्हर्ट झाले. Q. शहरीकरणाचा रात्रीच्या तापमानावर काय परिणाम होतो? A : शहरांमध्ये सिमेंट-काँक्रीटची बांधकामे, रस्ते दिवसा उष्णता शोषून घेतात. रात्री ती हळूहळू बाहेर सोडते, यामुळे रात्री २ वाजेपर्यंत किंवा पहाटेपर्यंत शहरात उष्ण झळा व उकाडा कायम राहतो. जंगलांचा ऱ्हास व वृक्षतोडीमुळे निसर्गाची नैसर्गिक कूलिंग यंत्रणा नष्ट झाली आहे. Q. तापमान नियंत्रणासाठी कोणते उपाय आहेत? A : शहरांना हिरवेगार करणे हा यावरील कायमस्वरूपी उपाय आहे. नागरिक व प्रशासनाने घराजवळ व शक्य तेथे मोठी झाडे लावावीत.
Source link
अकोलेकर हैराण:रात्री उशिरापर्यंत असतो 31 अंशांवर पारा; बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे रात्रभर उकाडा