- Marathi News
- National
- Treat Digital Arrests As Strictly As Robbery Supreme Court, Cases From 12 States Are Not Together
दिल्ली1 मिनिटापूर्वी
- कॉपी लिंक

डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीला सर्वोच्च न्यायालयाने ‘डिजिटल दरोडा’ असे म्हटले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, हा सामान्य खंडणी वसुलीपेक्षा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विशेषतः वृद्धांना लक्ष्य केले जाते. अशा निर्दयी गुन्हेगारांशी कडकपणे निपटले पाहिजे. कायद्यात खटला चालवण्यापूर्वीच शिक्षेची तरतूद असेल, तर तिचाही वापर झाला पाहिजे, अशी तोंडी टिप्पणी त्यांनी केली.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर गौरव कुमार साहा व निधी भंडारी यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या दोघांनी आपल्याविरोधात १२ राज्यांत नोंदवलेले ३५ सायबर गुन्ह्यांचे खटले एकाच ठिकाणी एकत्र करण्याची मागणी केली होती. याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, ते स्वतः फसवणुकीचे बळी आहेत. कोर्ट म्हणाले, आरोपींच्या सोयीसाठी पीडितांना दिल्लीला बोलावू शकत नाही. विविध राज्यांतील तपासावर परिणाम होऊ देणार नाही.
उत्सवांत धोका, बनावट अॅप्सपासून सावध
- सायबर सुरक्षा कंपनी ‘आर्कटिक वुल्फ’च्या मते, ऑनलाईन खरेदी, पेमेंट,प्रवास बुकिंग वाढले, सायबर फसवणुकीचा धोका वाढू शकतो.
- गुन्हेगार मोठी सूट (डिस्काउंट), पार्सल डिलिव्हरी, बँक अलर्ट, केवायसी अपडेट , वीज बिल म्हणून बनावट मेसेज पाठवू शकतात.
- एसएमएस, व्हॉट्सॲप आणि ईमेलद्वारे पाठवलेल्या लिंक्सवरून वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. बनावट अॅप्स पासवर्ड आणि ओटीपीही चोरू शकतात.
- बचावासाठी अनोळखी लिंक्स उघडू नका, संशयास्पद अॅप्स इन्स्टॉल करू नका.पेमेंट ,केवायसी संबंधित संदेशांची खात्री करा.
- कोर्ट म्हणाले, आरोपींच्या सोयीसाठी पीडितांना दिल्लीला बोलावू शकत नाही. विविध राज्यांतील तपासावर परिणाम होऊ देणार नाही.