Headlines

Tukaram Mundhe Bans Junk Food Near Schools; Save Food Campaign Maharashtra


हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी आणि क्लबवरील धडक कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस

.

पत्रकार परिषदेत बोलताना मुंढे यांनी सांगितले की, राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून, त्यासाठी अन्न सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

नव्या धोरणानुसार राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हे नियम लागू राहतील. शालेय कँटीन, मध्यान्ह आहार पुरवठादार, वसतिगृहांतील मेस तसेच अंगणवाडीपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या सर्व संस्था आणि पुरवठादारांकडे भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा (FSSAI) वैध परवाना असणे अनिवार्य करण्यात आले आहे. वैध परवानाधारक संस्थांकडूनच अन्नाची खरेदी करता येणार आहे.

शाळांभोवती जंक फूडला आळा

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी शाळेच्या परिसरात ‘हाय फॅट, हाय सॉल्ट आणि हाय शुगर’ (HFSS) पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळेच्या ५० मीटर परिसरात अशा पदार्थांची विक्री तसेच त्यांच्या जाहिरातींनाही पूर्णपणे बंदी असेल. या नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याची प्राथमिक जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापनावर सोपविण्यात आली आहे.

‘ईट राईट स्कूल’ संकल्पना बंधनकारक

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘ईट राईट स्कूल’ ही संकल्पना अनिवार्यपणे राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना सुरक्षित, संतुलित आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

वर्षातून दोनदा अन्न तपासणी

एफडीएकडून प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोन वेळा तपासणी केली जाईल. अन्नाचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातील. तसेच प्रत्येक शाळेत ‘फूड सेफ्टी बोर्ड’ लावणे आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, यासाठी ‘फूड सेफ्टी सुपरवायझर’ नियुक्त करणे बंधनकारक असेल.

याशिवाय शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वयंपाकगृह आणि अन्न हाताळणीच्या सर्व मानकांचे पालन करणेही आवश्यक राहणार आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

या मोहिमेच्या अंमलबजावणीत शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभागाची महत्त्वाची भूमिका राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्था आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. २०२० मध्ये तयार करण्यात आलेल्या नियमावलीची अंमलबजावणी २०२१ पासून सुरू झाली असली, तरी आता ती अधिक कठोरपणे राबविण्यात येणार आहे. या संपूर्ण मोहिमेचा दरमहा आढावा घेतला जाणार असल्याची माहितीही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

हे ही वाचा…

दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला:गुरुपौर्णिमेचे औचित्य अन् ‘रयत शिक्षण संस्था’चा विषय, वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार आणि शरद पवार गट केंद्र सरकारला पाठिंबा देऊन एनडीएमध्ये सामील होणार, अशा चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे. या सर्व घडामोडी चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या हायप्रोफाइल भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सविस्तर वाचा…

किचनमध्ये झुरळे, माश्या अन् कालबाह्य अन्नधान्य:मुंबईतील 5 नामांकित क्रीडा क्लबला FDA चा दणका, FSSAI परवाने निलंबित

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचा फटका आता मुंबईतील प्रतिष्ठित क्रीडा क्लबनाही बसला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघड झाल्यानंतर एफडीएने मुंबईतील पाच नामांकित क्लबचे FSSAI परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. त्यामुळे मुंबईतील खाद्य व्यवसाय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.