- Marathi News
- National
- Violence Breaks Out Again In Manipur; 3 Priests Killed In Indiscriminate Firing, 5 Others Injured, Kuki Organizations Block NH 2, Kangpokpi Closed
सत्यनारायण मिश्र | इंफाळ8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. कांगपोकपी जिल्ह्यात बुधवारी भरदिवसा ३ पादरींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर इतर पाच जण जखमी आहेत. घटनेनुसार थाडो बॅप्टिस्ट असोसिएशनशी (टीबीए) संबंधित चर्चचे पदाधिकारी दोन कारमधून चुराचांदपूरहून कांगपोकपीला परतत होते.
वाटेत कोटजिम आणि कोटलेन गावाच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार सुरू केला. यामुळे कारमधील पाद्री, मणिपूर बॅप्टिस्ट कन्व्हेन्शनचे माजी सरचिटणीस व्ही. सितल्होउ, व्ही. कैगौलुन आणि पाओगौलेन यांचा मृत्यू झाला. आसाम रायफल्सच्या जवानांनी जखमींना इंफाळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ कुकी-जो संघटनांचे लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी आसामला मिझोरामशी जोडणारा एनएच-२ रोखून धरला. तसेच कांगपोकपी जिल्ह्यात बंदची घोषणा केली. मणिपूरचे मुख्यमंत्री खेमचंद सिंह आणि नागालँडचे मुख्यमंत्री निफू रिओ यांनी या घटनेचा निषेध केला आहे.