Headlines

Why Break Parties? Does Maharashtra Need Opposition?


सत्ताधाऱ्यांकडून केवळ पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू असून, या राजकीय ‘ऑपरेशन्स’च्या नादात महाराष्ट्र आयसीयूमध्ये पोहोचला आहे. राज्याकडे सत्ताधाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याची घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष वसं

.

सध्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना वसंत मोरे म्हणाले की, सत्ताधारी केवळ ‘ऑपरेशन टायगर’, ‘ऑपरेशन तुतारी’ आणि ‘ऑपरेशन 3.0’ यामध्येच व्यस्त आहेत. त्यांच्याकडे आधीच स्पष्ट बहुमत असताना त्यांना इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी का हवे आहेत? हे न समजण्यासारखे आहे. देशातील लोकशाही संपवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू असून, त्यांनी हे फोडाफोडीचे राजकारण थांबवून राज्याकडे लक्ष दिले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

शिंदेंची ऑफर नाकारली

यावेळी बोलताना मोरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. मला शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑफर आली होती. उपमुख्यमंत्र्यांनी माझी आठवण काढली असून महापालिकेत ऑफिस घेऊ, असे मला सांगण्यात आले. मात्र, मी ती ऑफर स्पष्टपणे नाकारली आणि शहरप्रमुखपद स्वीकारले. मी कायम विरोधी पक्षात राहिलो असून मला कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा नाही, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज

वसंत मोरे म्हणाले की, सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात लोक पक्ष सोडून जात आहेत, तर नक्कीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खासदार संजय राऊत यांनीही काल हेच सांगितले. जेव्हा लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि पदाधिकारी पक्ष सोडतात, तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असतेच. सचिन अहिर यांच्या जाण्याने आम्हा शिवसैनिकांना खूप मोठा धक्का बसला. ते पुण्यात पक्षासाठी खूप चांगले काम करत होते. पुण्यातील काही लोक पक्षाला सोडचिठ्ठी देणार, हे मी शहराध्यक्ष झालो त्याचवेळी मला समजले होते, असा दावाही त्यांनी केला. अधिवेशन काळात आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि अनिल परब जशी आक्रमक भूमिका घेतात, तशीच आक्रमक भूमिका सर्व लोकप्रतिनिधींनी घेण्याची आवश्यकता असल्याचे मतही मोरे यांनी व्यक्त केले.

हे ही वृत्त वाचा

भविष्यात मोदी-शहा एकमेकांनाच फोडतील:महायुती म्हणजे रामद्रोही अन् धर्मद्रोह्यांचा अड्डा, राज ठाकरेंचे म्हणणे योग्यच, हा तर देहविक्रीचा प्रकार- राऊत

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणाचे सत्य सांगितले आहे. हा सर्व देहविक्रीचाच प्रकार आहे. उद्या शिंदे गटातील लोकं दुसरीकडे जायला कमी करणार नाहीत. तुम्हाला मुलांसारखे सांभाळले आणि तुम्ही लफडे करत तिकडे गेलात, असे म्हणत उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांना टोला लगावला आहे. अहिर यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला तो गेल्यावर ठाकरेंना काय वाटले असेल. आता एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा एकमेकांना फोडण्याचे काम करतील. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *