Headlines

अखेर वसमतच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा:गोवंश प्रकरण भोवले, नवीन उपनगराध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरू




वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारात 19 गोवंश सापडल्यानंतर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात उपनगराध्यक्ष इमरान अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांनी नुकताच पदाचा राजिनामा दिला असून त्यांचा राजिनामा बुधवारी ता. 5 मंजूर करून जिल्हा प्रशासनाकडे याबाबत कळविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र प्रकृती व वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केल्याचेही सुत्रांनी सांगितले. वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारात एका शेतात वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात 19 गोवंश आढळून आले होते. चारा, पाण्याशिवाय बांधलेले गोवंध कत्तलीसाठी वाहतुक करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचा संशय होता. त्यानुसार ता. 30 जुलै रोजी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात उपनगराध्यक्ष इमरान अली याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार विजयकुमार उपरे यांनी अधिक तपास चालविला आहे. यावेळी पोलिसांच्या चौकशीमध्ये इमरान अली याने सदर शेत शेख जाकेर याला खंडून दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी शेख जाकेर याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर दोषींवर कडक कारवाई करावी, उपनगराध्यक्ष इमरान अली यांचा राजिनामा घ्यावी या मागणीसाठी एका गटाने मोर्चा काढला होता. त्यामुळे वसमत शहराचे वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, त्यानंतर उपनगराध्यक्ष इमरान अली यांनी पदाचा रजिनामा नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांच्याकडे दिला आहे. त्यांचा राजिनामा मंजूर करण्यात आला असून पुढील प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रकृती व वैयक्तिक कारणामुळे आपण वेळ देऊ शकत नसल्याने राजिनामा देत असल्याचे पत्रात नमुद केल्याचेही सुत्रांनी सांगितले. आता नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी राजकिय हालचालींना वेग आला असून आमदार राजेश नवघरे यांच्या भुमिकेकडे वसमतच्या राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *