![]()
दहशतवादी कारवायांसाठी बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय शासकीय अधिकारी हे ओैंध भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर ३१ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. मुंबईतील दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) अधिकारी असल्यचाी बतावणी चोरट्यांनी केली. ‘ पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून बँक खात्यात ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले असून, या प्रकरणात अटक करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील’, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. त्यानंतर चोरट्यांच्या बँक खात्यात त्यांनी वेळोवेळी पाच लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शीतल जाधव तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने व्यापाऱ्याची फसवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका व्यापाऱ्याची तीन लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ५४ वर्षीय व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी तक्रादारांना शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांच्या आमिषाला ते बळी पडले. चोरट्यांच्या खात्यात त्यांनी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.
Source link
अटकेची भीती दाखवून निवृत्त अधिकाऱ्याला पाच लाखांचा गंडा:दहशतवादी कारवायांसाठी खात्याचा वापर झाल्याचे सांगितले; शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने व्यापाऱ्याचीही फसवणूक