Headlines

अदाणींनी 4 उत्तराधिकारी निवडले, यांमध्ये 2 मुले, 2 पुतणे:₹27 लाख कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत; व्यवसाय कधी सोपवणार, हे सांगितले नाही




अदाणी समूहाचे संस्थापक व अध्यक्ष ६४ वर्षीय गौतम अडाणी आपल्या व्यावसायिक साम्राज्याची सूत्रे कुटुंबातील चार निवडक सदस्यांच्या टीमकडे सोपवणार आहेत. या टीममध्ये त्यांचे दोन मुले करण आणि जीत तसेच दोन पुतणे प्रणव आणि सागर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे पूर्ण नियंत्रण कधी सोपवले जाईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. अदाणी यांनी फॉर्च्यून इंडियाशी विशेष संवाद साधताना सांगितले, ‘पुढच्या पिढीला नेतृत्व वारशाने मिळत नाही. ते मिळवण्याची जबाबदारी मात्र वारशाने मिळते.’ भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या अदाणी समूहाच्या सुमारे डझनभर कंपन्यांचे बाजारमूल्य १७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. वैयक्तिक संपत्ती सुमारे १०.११ लाख कोटी रुपये आहे. प्रणव सर्वांत मोठे, समूहाशी जोडून २७ वर्षे झाली १. करण अदाणी (मोठा मुलगा, वय- ३९ वर्षे) 2009 मध्ये मुंद्रा पोर्टवर कार्यकारी समूहाशी जोडले गेले. 2016 मध्ये अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनचे सीईओ बनले. अलीकडेच कंपनीने ‘इवोस’चे सुमारे 2.41 लाख कोटी रुपयांमध्ये अधिग्रहण केले. 2. जीत अदाणी (धाकटा मुलगा, वय- 29 वर्षे) २०१९ मध्ये समूहाशी जोडले गेले. समूहाच्या सीएफओ कार्यालयातून कारकिर्दीची सुरुवात केली. अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) मध्ये संचालक आहेत, जी आठ विमानतळांच्या संचालनाची जबाबदारी सांभाळते. ३. प्रणव अदाणी (पुतण्या, वय- ४८ वर्षे) अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडचे संचालक आणि कृषी, तेल व वायू विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. प्रणव यांनी आपल्या नेतृत्वाच्या प्रवासाची सुरुवात १९९९ मध्ये कृषी-वस्तू क्षेत्रातील संयुक्त उपक्रम ‘अदाणी विल्मर’सोबत केली होती. ४. सागर अदाणी (पुतण्या, वय- ३२ वर्षे) अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक. अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर 2015 मध्ये समूहाशी जोडले गेले. अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या संपूर्ण सौर आणि पवन ऊर्जा पोर्टफोलिओची उभारणी करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *