![]()
दिवाळी आनंदाच्या सणात फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन एडीफाय शाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. केवळ भाषणातून उपदेश न करता शिक्षकांनी नाटिकेच्या
.
शाळेत दिवाळी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्री महालक्ष्मी पूजनाने झाली. मुख्याध्यापक तुषार येरपुडे आणि शाळा प्रशासन प्रमुख अतुल अंबारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर शिक्षकांनी प्रार्थना सादर केली. शिक्षकांनी सादर केलेल्या नाटिकेतून फटाक्यांच्या आवाजामुळे होणारा त्रास, हवेचे प्रदूषण आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम दाखवण्यात आले. निसर्गाला हानी न पोहोचवता दिवाळी साजरी करता येते, हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. नाटिकेचे दिग्दर्शन सांस्कृतिक विभागप्रमुख भारत मोंढे यांनी केले. यात इशान कापडिया, अब्दुल सलीम, सुरेश झालटे, अनुजा देशमुख, दीपाली गायकवाड, विद्या तिखिले, मनीषा गवई आणि हर्षाली तायडे या शिक्षकांनी सहभाग घेतला. दुसरीतील विद्यार्थिनी स्वामिनी रेचे हिने नृत्य सादर केले. मनन चोपडा आणि मनु पाटील यांनी दिवाळीचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक तुषार येरपुडे यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी लाल गटप्रमुख दुर्गा लक्ष्मी, गटातील सदस्य, कलाशिक्षिका निधी कडू आणि इतर शिक्षकांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. संगीता गावंडे यांनी केले. शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. पुरणलाल हबलानी, संचालक रवी इंगळे आणि शिवा रामा कृष्णा यांनी शुभेच्छा दिल्या.