Headlines

अधिकमास संपला, तरी गौडगावमधील हनुमान मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी:भक्तिमय वातावरणात दोन हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप


.

अधिकमासाची सांगता झाली असली तरी अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव बुद्रुक येथील दक्षिणमुखी जागृत हनुमान मंदिरात भक्तांची गर्दी कायम असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

मंदिरात शनिपूजा, नवग्रह शांती, होम-हवन आदी धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले. हनुमान मंदिराच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे परिसरातील रिक्षा, टमटम व अन्य वाहन चालकांनाही रोजगार उपलब्ध होत असून स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी कलबुर्गी येथील भक्त नागेंद्रप्पा ब. रुदनूर यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर समितीने दर्शन रांग, पिण्याचे पाणी, निवास व स्वच्छता यांची उत्तम व्यवस्था केल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई येथील कस्टम विभागाचे अधिकारी कन्हैय्यालाल बुरडे यांनी देवस्थान व भक्तनिवासाची पाहणी केली. मंदिर परिसरातील स्वच्छता, नियोजनबद्ध व्यवस्था आणि प्रशस्त भक्तनिवास पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीर्फे त्यांचा सत्कार झाला. करण्यात आला. तसेच मंदिरात प्रत्येक मंगळवार व शनिवारी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असते. अक्कलकोट रेल्वे स्थानक जवळ असल्याने श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणारे अनेक भाविक गौडगावच्या जागृत हनुमान मंदिरालाही आवर्जून भेट देत आहेत. महाप्रसाद आणि भक्तनिवासाच्या सुविधांमुळे भाविकांची संख्या वाढत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.

गौडगाव हनुमान मंदिर ठरतेय भक्तांचे आकर्षण केंद्र अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासोबतच गौडगाव येथील दक्षिणमुखी जागृत हनुमान मंदिराला भेट देण्याकडे भाविकांचा वाढता कल दिसून येत आहे. धार्मिक विधी, महाप्रसाद, निवास व्यवस्था आणि सहज दर्शन यामुळे मंदिर परिसरात वर्षभर भाविकांची वर्दळ कायम राहत आहे.

हनुमान मंदिरात नवग्रहांची स्थापना ^हनुमान मंदिरात नवग्रहांची स्थापना करण्यात आली असून भाविकांना या नवग्रहाच्या दर्शनामुळे मन प्रसन्न होऊन शांती लाभते. मंदिर समितीच्या वतीने भाविकांच्या सुख समृद्धीसाठी मंदिरात विशेष यज्ञ, होम, हवन करण्यात येते. – श्रीकांत खानापूरे, अध्यक्ष जागृत हनुमान मंदिर, गौडगांव बु (ता. अक्कलकोट)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *