![]()
अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जाते म्हणून नागरिकांची कामे रखडतात, याचा अनुभव सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्यांच्या सूचनेवरुन नियोजन भवनात जनता दरबार भरवला होता. त्यात तक्रारदारांची एवढी गर्दी झाली की काही काळ पालकमंत्र्यांनाही कामकाज थांबवावे लागले. पोलिसांनी गर्दी नियंत्रित केली, त्यानंतर दरबारचे काम पुन्हा सुरु केले. पालकमंत्री कार्यालयाने केलेल्या मोजदादनुसार जनता दरबारात सुमारे एक हजारहून अधिक तक्रारी आल्या. त्याचा परामर्श घेत त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तहसीलदारांनी पैसे मागितले, नगरसेवकाने अतिक्रमण केले, कोणार्क कंपनीने कर्मचाऱ्यांवर अन्याय केला, भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी के ली नाही, घरकुलाची रक्कम मिळाली नाही, वीज पुरवठा नियमित होत नाही, डीबी उघड्या पडल्या, स्वस्त धान्य दुकानातून रेशन मिळत नाही, अभ्यासिका नाही, भेटीची वेळ मागूनही अधिकारी उपलब्ध होत नाहीत, अशा एक नव्हे अनेक तक्रारींचा पाढा नागरिक वाचत होते आणि पालकमंत्री एकेका तक्रारीच्या अनुषंगाने यंत्रणेला योग्य ते निर्देश देत होते. म्हणून पालकमंत्र्यांनी घेतला जनता दरबार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगदी प्रारंभीच्या जिल्हा भेटीत आठवड्यातून एकदा अमरावतीत येऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकूण घेणार असल्याचे म्हटले होते. परंतु कार्यबाहुल्यामुळे ते तसे करु शकले नाहीत. दरम्यान नागरिक मात्र वारंवार तशी विचारणा करीत होते. अलिकडच्या तिवसा भेटीवेळीही हा मुद्दा पुढे आला होता. शेवटी आज त्यांना जनता दरबार घ्यावाच लागला. तक्रार सामुहिक वा व्यक्तिगत, तक्रारींची दखल घेऊन त्यांना पत्र पाठवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. अनेक नागरिक तक्रार ऐकवल्यानंतर पोहोच मागत होते. मात्र येथे पोहोच देता येणार नाही, तुमचे काम मात्र होईल, असे त्यांचे म्हणणे होते. जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकूण घेताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे. शेजारी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी. या अधिकाऱ्यांचा झाला पुकारा काही तक्रारी ऐकल्यानंतर पालकमंत्री संतापले . त्यामुळे काही अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्यात विभागीय सहनिबंधक, कृषी सहसंचालक, भूमी अभिलेख अधिकारी, भातकुलीचे तहसीलदार, मनपा आयुक्त, महावितरणचे अधीक्षक अभियंता, आरडीसींचा समावेश होता. बँका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जनता दरबारमधील तक्रारी ऐकल्यानंतर त्यांनी बँका, महावितरण च्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आ. प्रवीण तायडे, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रताप अडसड, प्रवीण पोटे, उमेश यावलकर, विभागीय आयुक्त नयना गुंडे ,जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जि.प. चे सीईओ सत्यम गांधी, पोलिस अधीक्षक निकेतन कदम, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, एसडीओ अनिल भटकर, विवेक जाधव उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या सूचना शेती, अन्य कामांसाठी वाळू-माती नेणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरची अडवणूक करू नका. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुपारी ३ ते ५ दरम्यान अभ्यागतांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवावे. नागरिकांची चौकशी करून संबंधित विभागाकडून वेळेत अडचणी दूर करण्याचा त्यांना विश्वास द्या.
Source link
अधिकाऱ्यांकडून अडवणूक; त्रस्त नागरिक पालकमंत्र्यांच्या दरबारात:1000 हून अधिक तक्रारींची सुनावणी, अनेकांचे समाधान, बरेच नाराजही