![]()
तीन वर्षांनी येणारा अधिक मास सध्या सुरू असून सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. हा महिना संपण्यासाठी अवघे पंधरा दिवसच शिल्लक असल्याने या पार्श्वभूमीवर घाटनांद्रा परिसरातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र असलेल्या व मराठवाड्याची कुलस्वामिनी म्हणून ओळखल्य
.
दररोज पहाटेपासूनच देवीच्या गडावर भक्तांची रांग लागलेली दिसून येत असून परिसर भक्तिमय झाला आहे. मंगळवारी शेकडो भाविकांनी देवीच्या गडावर जाऊन देवीचे दर्शन घेत मनोभावे पूजा-अर्चा केली. यावेळी अनेक महिला भाविकांनी पारंपरिक पद्धतीने देवीला धोंडे, ३३ बत्तासे, ३३ अनारसे तसेच तांब्याचे भांडे आदी प्रकारचे वाण अर्पण केले. अधिक मासात देवीचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात. अशी श्रद्धा भाविकांमध्ये असल्याने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येत आहेत. तसेच सध्या शाळांनाही सुट्या असल्याने व हा परिसर निसर्गरम्य वातावरणात असल्याने सुट्टी घालवण्यासाठी देखील पर्यटक मोठी गर्दी करत आहे.
दर्शनासह पर्यटनाचाही आनंद देवदर्शना सोबतच भाविक पर्यटनाचाही आनंद घेत आहे. देवस्थान परिसरात भक्तांच्या सोयीसाठी स्थानिक ग्रामस्थ व मंदिर समितीकडून विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानाचे पदाधिकारी परिश्रम घेत असून गड परिसरात सध्या भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.