Headlines

अन्नछत्र मंडळाच्या महाप्रसादगृहाचे काम वर्षात दुसऱ्या मजल्यापर्यंत प्रगतीपथावर:छतावर 51 फुटांची स्वामींची मूर्ती आणि एकाचवेळी 7500 भाविकांची क्षमता‎


.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून स्वामीभक्तांची सेवा व नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. सध्याचे महाप्रसादगृह भविष्यात वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे अपुरे पडू शकते याचा विचार करुन मंडळाने पाच मजली वातानुकुलित महाप्रसादगृहाच्या निर्मीतीचा संकल्प केला.

दरम्यान मागील वर्षी गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर सदर बांधकामाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आले. या ठिकाणी दुसऱ्या मजल्यापर्यंतचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. १,१९,३९८ चौरस फुट इतक्या विशाल जागेवर महाकाय बांधकाम सुरु केले आहे. नियोजित महाप्रसादगृहात एकाचवेळी २५०० भक्त जेवणासाठी तर त्याचवेळी ५००० भाविक वातानुकुलित प्रतिक्षालयगृहात बसण्याची व्यवस्था असणार आहे.

नियोजित महाप्रसाद ग्रहाच्या छतावर जवळपास ५१ फुटांची स्वामी समर्थांची मूर्ती, मेघ डंबरीसह अक्कलकोटच्या बाहेरून कोणत्याही दिशेने येणाऱ्या भाविकांचे लांबुनच लक्ष वेधून घेणार आहे. शेकडो वर्षे टिकेल असे मजबूत अन् झालेल्या बांधकामात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही यादृष्टीने येथील काम सुरू आहे. अत्याधुनिक मटेरियल व अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर याठिकाणी सुरु असुन एप्रिल २०२७ पर्यंत सदरचे बांधकाम पुर्ण होण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. अन्नछत्रच्या बांधकामात ब्लॅक जपान पेंटचा वापर करण्यात आला आहे. यामुळे झालेल्या बांधकामात कुठेही पाणी लागत नाही. जीआरसी (ग्लास रेनफोर्सड काँक्रीट) तंत्रज्ञानामुळे तीनही ऋतुपासुन बांधकामाचे शेकडो वर्षे रक्षण होते. तसेच बांधकामात २५ एमएम लेन्थच्या स्पेशल (५१ फुट अखंड) स्टीलमुळे मजबुती मिळाली आहे. मुख्य महाप्रसादगृहात ६६ फुट रुंदीपर्यंत कुठेही सपोर्ट नसताना स्लॅब आहे, ही खासीयत म्हणावी लागेल. सर्व बाबींची कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे या शासकीय संस्थेकडून चाचणी करण्यात येत आहे. महाप्रसादगृहाच्या बांधकामासाठी ५ टन क्षमता, १०० फुट उंच व १५० फुटी बुम असलेल्या क्रेनचा वापर करण्यात येत आहे. हे क्रेन सर्व बाजुंनी काम करते. तसेच कमी वेळेत जास्त वजनाचे काम करण्यास क्रेन उपयोगी पडत आहे. मजुरांची कमतरता यामुळे जाणवत नाही.

अत्याधुनिक तंत्रज्ञान, महाकाय क्रेनचा वापर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *