Headlines

अभिनेता दिनो मोरियावर अटकेची टांगती तलवार:आठ तासांपासून चौकशी; नेमकं प्रकरण काय?




मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा प्रकरणाच्या तपासाला आता अभिनेता दिनो मोरिया याच्याशी संबंधित चौकशीमुळे वेगळे वळण मिळाले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दिनो मोरियाला चौकशीसाठी बोलावले असून, या प्रकरणात त्याची पुन्हा चौकशी केली जात आहे. तपासादरम्यान काही संबंधित व्यक्तींशी असलेल्या संपर्काचे फोन रेकॉर्ड समोर आल्यानंतर मोरियाला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. 65 कोटींच्या कथित गैरव्यवहाराचा तपास मिठी नदीच्या गाळ उपसा कामात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात मुंबई महापालिकेला सुमारे 65.54 कोटी रुपयांचे कथित नुकसान झाल्याचा EOWचा आरोप आहे. 2021-22 आणि 2022-23 या कालावधीतील गाळ उपसा कंत्राटांशी संबंधित व्यवहार तपासाच्या कक्षेत आहेत. या प्रकरणात BMC अधिकारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांसह 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनो मोरियाशी संबंधित व्यवहारांची तपासणी तपास यंत्रणेला दिनो मोरिया आणि या प्रकरणातील आरोपी केतन कदम यांच्यातील काही आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाल्याचे वृत्त आहे. तसेच मोरिया यांचे बंधू सॅन्टिनो रोको मोरिया आणि केतन कदम यांच्या पत्नी पुनीता कदम हे एका खासगी कंपनीचे संचालक राहिले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे या व्यावसायिक आणि आर्थिक संबंधांचा तपास केला जात आहे. यापूर्वीही झाली होती चौकशी दिनो मोरिया आणि त्यांचे बंधू सॅन्टिनो यांची यापूर्वी मे 2025 मध्येही EOWने चौकशी केली होती. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणाशी संबंधित मनी लाँडरिंग तपासात दिनो मोरिया यांची चौकशी केली होती. कंत्राट प्रक्रियेवरही पोलिसांचा तपास EOWच्या तपासानुसार, मिठी नदीतील गाळ उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट यंत्रसामग्रीच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा संशय आहे. काही कंत्राटदारांना विशिष्ट कंपन्यांकडून यंत्रे भाड्याने घेण्यास भाग पाडल्याचा आरोप तपासात करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे, कथित फुगवलेले दर आणि गाळ उपशाच्या कामाशी संबंधित नोंदींचीही तपासणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत काही मध्यस्थ आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे. मिठी नदीच्या गाळ उपसा कामातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सुरू असून, दिनो मोरिया यांच्याशी संबंधित व्यवहार आणि संपर्कांची माहिती तपासातून पुढे येण्याची शक्यता आहे. कोण आहे दिनो मोरिया? करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून करणाऱ्या दिनो मोरियाने ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००२ साली बिपाशा बासूसोबत आलेल्या ‘राज’ या सिनेमाने त्याला रातोरात सुपरस्टार बनवले. मध्यंतरी अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर २०२१ मध्ये त्याने ‘द एम्पायर’ या वेब सिरीजमधून कमबॅक केले. नुकताच तो अक्षय कुमारच्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटामुळेही चर्चेत होता. मात्र, आता थेट आर्थिक घोटाळ्यात नाव आल्याने तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. हेही वाचा.. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: अलिबागमधून आणखी 2 आरोपींना बेड्या; दोन आरोपी अद्याप फरार, 9 पथकांकडून आरोपींचा शोध मानपाडा परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. या हत्येतील आणखी दोन मुख्य आरोपिंना पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावरील अलिबागजवळ एका डेअरीतून बेड्या ठोकल्या आहेत. निखिल यादव आणि नितेश पवार अशी या अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहे. या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *