![]()
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. शेगावहून वर्धाकडे दुर्गा देवीची मूर्ती घेऊन जाणारी बोलेरो पिकअप आणि मागून येणाऱ्या ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत 7 जणांचा मृत्यू झाला असून, 18 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका पिकअप गाडीमधून काही भाविक शेगावहून वर्ध्याकडे दुर्गा देवीची मूर्ती घेऊन जात होते. समृद्धी महामार्गावरील चॅनल 97 जवळ आले असता, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने या पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपच्या मागे लावलेल्या ट्रालीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताचे प्राथमिक कारण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिकअप गाडीचा वेग अत्यंत कमी होता आणि गाडीला मागे ट्रॉली जोडलेली होती, ज्यामुळे मागून येणाऱ्या ट्रकचालकाचा अंदाज चुकला आणि हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच, पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या भीषण अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी तातडीने वर्धा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. …हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत
Source link
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे जवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात:पिकअप अन् ट्रकच्या धडकेत 7 जण जागीच ठार, 18 जखमी