Headlines

अमरावती विद्यापीठात प्लँट मेटाबोलाईट रेफरन्स स्टँडर्डस् लाँचिंग:बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा




संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) विभागातर्फे ‘प्लँट मेटाबोलाइट रेफरन्स स्टँडर्ड्स’ च्या लाँचिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता कुलगुरू कार्यालयात होणार आहे. या उपक्रमामुळे वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. वनस्पतींमधील औषधी गुणधर्माचा शोध घेणे आणि औषध निर्मिती क्षेत्राला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. हार्माइन, डायोजेनिन, बोएराव्हिनोन बी, विथेफेरिन हे उच्च-शुद्धतेचे रेफरन्स स्टँडर्ड्स वनस्पती चयापचय घटकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या प्रमाणिकरणासाठी उपयुक्त ठरतील. हे स्टँडर्ड्स उच्च क्षमता तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केले जात आहेत. विशेष म्हणजे, महाराष्ट्र शासनाच्या आरजीएसटीसी आणि पुणे येथील आगरकर संशोधन संस्था यांच्या सहकार्याने कमी किमतीच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे हे स्टँडर्ड्स प्राप्त केले जात आहेत. “संशोधनाला चालना देणे, नाविन्यतेला सक्षम करणे आणि जीवन समृद्ध करणे हा विद्यापीठाचा मुख्य दृष्टिकोन आहे,” असे विद्यापीठाने म्हटले आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्ततेसाठी जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहसंशोधक डॉ. हरिप्रसाद पैकराओ, डॉ. सुरेंद्र पाटील, डॉ. अंकित काळे, ज्ञानेश्वरी चोखट आणि पल्लवी मरकाम हे प्रकल्प सहकारी म्हणून भूमिका बजावत आहेत. विद्यापीठाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची प्रतिष्ठा निश्चितच उंचावेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *