![]()
अधिकमासानिमित्त आयोजित ८दिवसांच्या कथा, अखंड हरिनामसप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणसोहळ्याने शहरात एकाआध्यात्मिक पर्वाची अनुभूती दिलीआहे. अमळनेरच्या सखाराममहाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेल्याया उपक्रमात तब्बल ३,५०० भाविकएकाच मंडपाखाली बसूनज्ञानेश्वरीचे पारायण करत आहेत.या आयोजनासाठी महिनाभरापासूनआयोजकांची तयारी सुरू होती.पारायणासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ थेटगोरखपूरहून मागवले आहेत. सुमारे १५०० भक्तांचा परिवारअसलेला हा संप्रदाय आहे.अमळनेरकर महाराज सेवा संघाच्यावतीने आयोजित केलेला हा आठवामोठा कार्यक्रम आहे. यासप्ताहादरम्यान आलेल्याभाविकांसाठी दररोज सकाळचानाष्टा आणि भोजनाची व्यवस्थाकरण्यात आली आहे. भक्ती आणिसेवेचा हा अनोखा संगम यासोहळ्यातून पाहायला मिळत आहे. मायक्रो-मॅनेजमेंट अन् स्वयंसेवकांचे जाळे कोणत्याही मोठ्या धार्मिक सोहळ्याचेयश हे केवळ भाविकांच्या गर्दीवर नाही,तर त्याच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनावर(मायक्रो-मॅनेजमेंट) अवलंबून असते.या सप्ताहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजेयेथील चोख नियोजन हे आहे. ३,५०० हूनअधिक पारायणकर्ते आणि इतर भाविकअशा हजारो लोकांची व्यवस्थापाहण्यासाठी तब्बल २०० स्वयंसेवकांचीफौज रात्रंदिवस राबत आहे. या संपूर्णसोहळ्याच्या निर्दोष नियोजनासाठी ६वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यातआल्या आहेत. भोजन, मंडप, ग्रंथवितरण, स्वच्छता अशा प्रत्येकजबाबदारीचे समित्यांमध्ये योग्य वाटपझाल्याने एवढा मोठा सोहळा अत्यंतशांततेत आणि शिस्तीत पार पडत आहे. हेव्यवस्थापन शहरातील इतर संस्थांसाठीएक आदर्श मॉडेल ठरावे असेच आहे. कॉर्पोरेट आयोजनाने तरुणाई आकर्षित या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विठ्ठल,ज्ञानेश्वर, श्रीराम, गाय-वासरू, हत्ती यांच्या हुबेहूब प्रतिमा अत्यंत लक्षवेधी आहेत.धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन कॉर्पोरेट पद्धतीने केल्यामुळे तरुणाईलाआकर्षित करण्यातही या सोहळ्याची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे समोर येते. अधिकमासात ज्ञानेश्वरीपारायणाचे महत्त्व वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीच्यापारायणाला अनन्यसाधारण महत्त्वआहे. हिंदू धर्मशास्त्रानुसारअधिकमास हा जपासाठी,दानासाठी, ग्रंथाध्ययनासाठीसर्वोत्तममानला जातो. अमळनेरचेसखाराम महाराज यांनी आयुष्यभरभक्ती, नामस्मरण आणि नि:स्सीमसेवेचा मार्ग दाखवला. त्यांच्याचप्रेरणेने सुरू असलेला हा सप्ताहकेवळ एक धार्मिक विधी न राहता,समाजाला एकत्र जोडणाराआध्यात्मिक सेतू बनला आहे.”अधिकमासात हजारो भाविकांनीएकत्र येऊन असे सामूहिक पारायणकेल्याने समाजात सकारात्मकऊर्जेचा महास्रोत निर्माण होतो,’असे आध्यात्मिक आणितत्त्वज्ञानाचे अभ्यासक कृष्णामहाराज आरगडे म्हणाले.
Source link
अमळनेरकर महाराज संघाच्या 8 व्यापारायणात 3,500 भाविक सहभागी:6 समित्यांच्या माध्यमातून 200 स्वयंसेवक कार्यरत, 10 लाख खर्च