Headlines

अमेरिकेच्या न्यायालयात चिनी कंपनी हुआवेई दोषी:ट्रेड सीक्रेट चोरी आणि बँक फसवणुकीचे आरोप सिद्ध; 2019 पासून सुरू होता खटला




अमेरिकेतील न्यूयॉर्क न्यायालयातील ज्युरीने चिनी टेक कंपनी हुआवेईला ट्रेड सीक्रेट चोरीचा कट आणि बँक फसवणुकीसह १० प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आहे. अमेरिकेने २०१९ मध्ये हुआवेईवर आरोप केले होते की, कंपनीने अमेरिकन आणि इतर कंपन्यांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती चोरली. तसेच इराण, उत्तर कोरियासारख्या प्रतिबंधित देशांसोबत व्यवहार करणे आणि याबाबतची चुकीची माहिती अमेरिकन अधिकारी व बँकांना देण्याचाही आरोप होता. मात्र, अमेरिकन कंपन्यांची बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी) चोरण्याच्या सर्वात गंभीर फौजदारी कटाच्या आरोपातून कंपनीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अमेरिकेत कंपनीच्या व्यवसायावर आधीपासूनच बंदी आहे. हुआवेईने आरोपांना कट असल्याचे म्हटले हुवावेच्या वकिलांनी आरोप फेटाळून लावले. त्यांचे म्हणणे होते की, अमेरिकी तपास यंत्रणांनी कंपनीच्या २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांपैकी काही जणांच्या चुकांचा आधार घेऊन मोठ्या कटाची कहाणी तयार केली आहे. कंपनीने असेही म्हटले की, तंत्रज्ञानाच्या वापरासाठी तिने अब्जावधी डॉलर परवाना शुल्क म्हणून दिले आहेत. यापैकी सुमारे ७५% रक्कम अमेरिकी कंपन्यांना देण्यात आली. २०१९ पासून सुरू होते प्रकरण हुवावे स्मार्टफोन आणि दूरसंचार उपकरणे विकण्यासोबतच आता चिप निर्मितीच्या क्षेत्रातही पुढे जात आहे. चीनमध्ये ती एनव्हिडियासारख्या कंपन्यांच्या चिप्सना पर्याय म्हणून उदयास येत आहे. अमेरिकेने हुवावेविरुद्ध २०१९ मध्ये फौजदारी आरोप लावले होते. कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी आणि संस्थापकांची मुलगी मेंग वानझोऊ यांच्यावरही इराणमधील व्यवसायाबाबत एचएसबीसी बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप होता. त्यांना २०१८ मध्ये कॅनडामध्ये अटक करण्यात आली होती. तथापि, २०२१ मध्ये चीनच्या ताब्यात असलेल्या दोन कॅनडियन नागरिकांच्या सुटकेच्या कराराअंतर्गत तिला चीनला परतण्याची परवानगी मिळाली आणि अमेरिकेने तिच्याविरोधातील खटला मागे घेतला. अमेरिकेत व्यवसाय करण्यावर आधीपासूनच बंदी हुआवेई अनेक वर्षांपासून अमेरिकन दूरसंचार कंपन्यांना आपली उपकरणे विकू शकलेली नाही. अमेरिका आणि तिच्या काही सहयोगी देशांनी सुरक्षेच्या चिंतेमुळे कंपनीवर निर्बंध लादले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *