Headlines

समाज कल्याणच्या कामासाठी मंत्र्यांनी 72व्या मजल्यावर 5 कोटींची लाच मागितली:लहान कामांसाठीही मंत्री पैसे मागताय- संजय राऊत




लातूरमधील संस्थेच्या 25 कोटींच्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी समाज कल्याणमधील कामासाठी त्या खात्याच्या मंत्र्यांनी आपल्या 72 व्या मजल्यावरील खासगी घरी बोलावून स्वतः पाच कोटी रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत राऊत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. रक्कम न दिल्याने प्रस्ताव रखडल्याचा दावा राऊत यांनी केला असून आता या आरोपावर सामाजिक न्यायमंत्री काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. पोस्टमध्ये नेमके काय म्हटलंय? संजय राऊत यांनी पोस्ट करत म्हटलंय की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आपले सरकार हे भ्रष्ट्राचाराची खाण बनले आहे ..राज्याची आणि जनतेची लूट खुलेआम सुरू आहे, आपण काय करताय? लहान कामांसाठी देखील मंत्री पैसे मागत आहेत,हे अराजक आहे! लातूर येथील श्री नरसिंग उरगीर मला भेटले, या आधी त्यांची व्यथा घेऊन ते सरकार दरबारी,लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटले पण निकाल शून्य असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. असला दलितोद्धार काय कामाचा? संजय राऊत पुढे म्हणाले की, नरसिंग यांनी त्यांच्या आरती सेवाभावी संस्था लातूर यांचे माध्यमातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ट्रेनिंग सेन्टर उदगीर यासाठी प्रस्ताव दिनांक 6 / 10 / 2025 रोजी समाज कल्याण मंत्रालयात सादर केला,पंचवीस कोटी रुपयांचा परिपूर्ण असा हा प्रस्ताव. तो प्रस्ताव अद्याप समाज कल्याण मंत्री महोदयांनी मंजूर केला नाही त्याचे कारण मंत्री महोदयानी प्रस्तावाच्या 20% म्हणजेच साधारण पाच कोटीची लाच मुंबईतील 72 व्या मजल्यावर खाजगी घरी बोलवून स्वतः मागितली,ती रक्कम दिली नसल्यामुळे आपला प्रस्ताव अद्याप मंजूर केला नाही असे नरसिंग यांचे म्हणणे आहे! अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने पाच कोटी रुपयांची लाच मागितली जाते, ज्या अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात मोठे योगदान आहे!देवेंद्रजी, हा असला दलितोद्धार काय कामाचा? नरसिंग यांची कहाणी राज्यातील प्रत्येक माणसाची व्यथा आहे!असे राज्य सरकार बुडालेले बरे! असे म्हणतानाच आज नरसिंग उरगिरकर माध्यमाना भेटतील,त्याना अडवले नाही तर असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *