![]()
येथील अल्पवयीन मुलींसेाबत अश्लिल कृत्य करणारा अयान अहमद तनवीर अहमद व त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना भर चौकात कठोर शिक्षा करा, अशी मागणी मुस्लीम संघटनांनी केली. काजी ग्यासूद्दीन यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन ही मागणी केली.
.
हे प्रकरण पुढे आल्यानंतर मंगळवारी मुस्लीम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी ही मागणी केली. या पदाधिकाऱ्यांच्या मते या प्रकरणाशी अनेक धागे-दोरे जुळलेत. अयानने केलेले हे कृत्य समाजासाठी घातक आहे. पोलिसांनी मुलींचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी. जाती धर्माचा विचार न करता नराधम म्हणून शिक्षा व्हावी,अशी मागणी या वेळी मुस्लिम संघटनांनी केली . मुस्लीम पदाधिकाऱ्यांच्या मते दोषी वर कारवाई कशी होईल, यासाठी प्रयत्न करावे. एसआयटी गठित करून या ची चौकशी झाली पाहिजे. उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम कुमार यांनाही या वेळी निवेदन देण्यात आले.