Headlines

अवकाळी नुकसानभरपाईसाठी शेतकरी संघटनेचा सटाणा तहसीलमध्ये ठिय्या:प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन‎




मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीची नुकसान भरपाई, पीक विमा, भेसळयुक्त खतांची विक्री आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या मागणीसाठी बागलाण तालुका शेतकरी संघटना आक्रमक झाली. तहसीलदारांच्या दालनात एक तास ठिय्या देत प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिला. सोमवार (दि. १७) रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्या दालनात ठिय्या देत विविध समस्या मांडत आक्रमक पविञा घेतला. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाची नुकसानभरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. तसेच एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई देण्यात यावी. तालुक्यात झालेल्या चुकीच्या पीक कापणी प्रयोगामुळे शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सुधारित अहवाल तातडीने पीक विमा कंपनीकडे पाठवावा. तसेचपीक कापणी प्रयोगाच्या चौकशीचा अहवाल त्यासोबत जोडावा यासोबतच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त खतांची विक्री होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. काही दुकानदार शेतकऱ्यांना खत खरेदीची पावती देत नसल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा प्रोत्साहनपर लाभ ५० हजार रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत करावा, या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणीही संघटनेने केली. प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकरी व शेतकरी संघटनांच्या सहभागातून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केशव सूर्यवंशी यांनी दिला. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष भास्कर बागुल, उपाध्यक्ष देविदास अहिरे यांच्यासह रविद्र सोनवणे, किशोर कदम, राजेंद्र सोनवणे, आदीसह शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. संघटनेच्या तक्रारीनंतर १३ फेब्रुवारी २०२५ रोजी एका कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा कोणत्या आधारे परवाना देण्यात आला आणि व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा तालुक्यातील ४४ हजार शेतकरी नूकसान भरपाईस पात्र आहेत. पैकी १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे. टप्प्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग होत आहे. त्याच बरोबर भेसळयुक्त खत विक्री बाबत कृषी विभागास कडक सूचना देण्यात आल्या आहेत. – कैलास चावडे, तहसीलदार बागलाण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *