Headlines

व्यसनमुक्ती, आरोग्य व राष्ट्रीय ऐक्याचा जागर:मनमाडमध्ये माजी सैनिकांचा सन्मान करत गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव‎




मनमाड शहरात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका, पोलिस दल, कृषी उत्पन्न बाजार समिती, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, डॉक्टर, रिक्षा युनियन तसेच विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीने ध्वजारोहण, वृक्षारोपण, जनजागृती रॅली, माजी सैनिकांचा सन्मान आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते पालिकेच्या मुख्य इमारतीवर ध्वजारोहण करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश पाटील व मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अनुकंपा व वारसा हक्काने पालिका सेवेत रुजू झालेल्या कामगारांना नगराध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. पोलिस परेड मैदानावर पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. पोलिस दलात तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी मनमाड शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती गणेश धात्रक व माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण व वृक्षारोपण झाले. यावेळी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. उपसभापती, संचालक मंडळ उपस्थित होते. डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील बागरेचा यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्ती व आरोग्यविषयक जनजागृती रॅली काढण्यात आली. मविप्र महाविद्यालय, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल व अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण करण्यात आले. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना अंतर्गत हर घर तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, उपप्राचार्य प्रा. सुभाष अहिरे, कुलसचिव समाधान केदारे, पर्यवेक्षक विठ्ठल फंड, लेफ्टनंट प्रा प्रकाश बर्डे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी, डॉ. एम. डी. आहिरे यांच्या उपस्थितीत झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *