Headlines

नाशिक जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचे 2 सौम्य हादरे:पहाटे 2.5 तर दुपारी 3.2 रिश्टरचा धक्का बसला




जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी, बागलाणसह त्र्यंबकेश्वर आणि नाशिक तालुक्यातील काही भागांना सोमवारी पुन्हा भूकंपाचे दोन धक्के जाणवले. मुरुमदरी, रोकडपाडा, डोंगराळे, राहूड, उंबरपाडा दिगर आणि सरड परिसरात धक्क्यांची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या नोंदीनुसार, सोमवारी पहाटे ५ वाजून ६ मिनिटे ४३ सेकंदांनी २.५ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्याचे केंद्र अक्षांश २०.४५७ व रेखांश ७३.६९१ येथे, तर खोली ५ किलोमीटर होती. त्यानंतर दुपारी १२ वाजून ४० मिनिटे ३१ सेकंदांनी ३.२ रिश्टर क्षमतेचा दुसरा धक्का नोंदवण्यात आला. भूकंपांची मालिका; केंद्राचे पथक अन् प्रशासनाचे लक्ष जिल्ह्यात वारंवार धक्क्यांचे कारण शोधण्यासाठी दिल्लीहून केंद्रीय पथकही नाशिकमध्ये आले होते. त्याने पेठ, सुरगाणा, दिंडोरी आणि मालेगाव या भागामध्ये भूकंपाच्या अद्ययावत आणि अचूक नोंदीसाठीचे आधुनिक यंत्रही बसवले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *