Headlines

जायकवाडीत पाण्यासोबत 12 टक्के गाळाचीही आवक:साठा 93 टक्क्यांवर, गाळाचे प्रमाण 18 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता‎




जायकवाडी धरणाचा पाणीसाठा २४ दिवसांत ३२ वरून ९३ टक्क्यांहून अधिक झाला असून यातून ५ टीएमसीहून अधिक पाणी गोदावरीत सोडले गेले आहे. सध्या ही आवक कमी सुरू असून यंदा जायकवाडीत दाखल झालेल्या पाण्याबरोबर १२ टक्क्यांपेक्षा अधिक गाळच आला असून नव्याने आलेल्या पाण्यासोबत गाळाचा थर वाढल्याने हे प्रमाण १८ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची शक्यता जलअभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले तरी प्रत्यक्ष उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करताना गाळाचा विचार करण्याची गरज असून तशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितुभाऊ परदेशी, नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी आमदार विलास भुमरेंसह पाटबंधारे विभागाकडे केली आहे. जायकवाडी धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असले तरी मागील वर्षी १०० टक्के साठा असतानाही पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने सिंचनाच्या नावाखाली १० ते १५ टीएमसी पाणी वाया गेल्याचा दावा करण्यात येत आहे. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी गाळाचा प्रत्यक्ष अंदाज घेऊन पाणीवाटपाचे नियोजन करण्याची मागणी शेतकरी नेते माउली मुळे यांनी केली आहे जायकवाडीच्या मृतसाठ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र तब्बल २१ हजार ७५० चौरस किलोमीटर असल्याने संपूर्ण धरणातील गाळ काढणे आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या अत्यंत खर्चिक ठरणार आहे. सात वर्षांपूर्वी गाळ काढण्यासाठी चार कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला होता. त्यासाठी भोपाळहून ड्रेजर मशीन आणण्यात आली होती. मोठे धरण असल्याने संपूर्ण गाळ काढणे शक्य नाही जायकवाडीच्या पाण्यात सध्याही काही प्रमाणात गाळ येत आहे. मात्र त्याचे अचूक प्रमाण सांगता येणार नाही. धरणाचे आकारमान आणि पाणलोट क्षेत्र मोठे असल्याने संपूर्ण गाळ काढणे आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. यंदा पाण्याबरोबर १२ टक्क्यांहून अधिक गाळ आला आहे. -गणेश हासे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *