![]()
करकंब येथे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात भजन व अभंग गायनाचा कार्यक्रम झाला. हभप बळीराम व्यवहारे, शुभम देशमुख, प्रभाकर वास्ते,मिलिंद देशपांडे यांनी गायन केले. त्यांना ओंकार व्यवहारे, बुवा महाराज, सदाशिव देशमुख यांनी संगीत साथ दिली. यावेळी पांडुरंग कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन नरसप्पा देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबुराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख,पंचायत समिती सदस्य राहुल पुरवत,उपसरपंच विवेक शिंगटे,बाळूआण्णा व्यवहारे, दिलीप देशमुख, अंकुश व्यवहारे, पांडुरंग व्यवहारे,अमर चव्हाण उपस्थित होते. प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते सुधाकरपंत परिचारक हे परिसासम व्यक्तिमत्त्व होते, कोणतेही पद असो किंवा नसो, त्यांचा मान-सन्मान कायम राहिला. आपण पदावर असल्यामुळे पदाला प्रतिष्ठा मिळावी की आपल्यामुळे पदाला प्रतिष्ठा मिळावी, हे सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या कर्तृत्वातून साध्य करून दाखवले. त्यांच्या कार्यामुळे अनेक पदांना खरी प्रतिष्ठा प्राप्त झाली,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार जगन्नाथ महाराज देशमुख यांनी केले. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ७०० हून अधिक जणांनी रक्तदान केले. ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वाखरी येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात हभप जगन्नाथ महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या स्मृती दिन कार्यक्रमास राज्याचे मंत्री गिरीश महाजन, समाधान अवताडे, अभिजित पाटील, उत्तम जानकर, बाबासाहेब देशमुख हे आमदार माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने, राम सातपुते हे माजी आमदार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बी.पी. रोंगे, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, पंचायत समितीचे सभापती डॉ. शुभम आगवणे, पंढरपूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे आदी उपस्थित होते.
Source link
वाखरीत 700 जणांचे रक्तदान, कीर्तन सोहळा रंगला, सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यामुळे अनेक पदांना प्रतिष्ठा मिळाली : हभप जगन्नाथ महाराज देशमुख