![]()
अंधश्रद्धा, तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडल्याची माहिती अशोक खरात याच्याविरोधात अनेक महिलांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल केल्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला असून तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अनेक धक्कादायक पुरावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. खरातच्या कार्यालय आणि फार्महाऊसवर झालेल्या कारवाईत महिलांचे शोषण केल्याचे कथित 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ सापडल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. खरातविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. प्रकरणातील तपास अधिक वेगाने होण्याची शक्यता दरम्यान, अशोक खरात याचे काही बडे राजकीय नेते आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संबंध असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. त्यामुळे आता निकम यांच्या नियुक्तीनंतर या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये प्रभावी युक्तिवाद करून दोषींना शिक्षा मिळवून देणारे उज्ज्वल निकम आता या प्रकरणात सरकारची बाजू मांडणार असल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. पंढरपुरात रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन सरसकट कर्जमाफीसाठी पंढरपुरात होणाऱ्या ‘अन्नत्याग आंदोलना’ला सुरुवात होण्यापूर्वीच प्रशासनाने आमदार रोहित पवार यांच्याविरोधात कडक पाऊल उचलले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये आणि शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या कारणास्तव पंढरपूर पोलिसांनी रोहित पवारांना अधिकृत नोटीस बजावली आहे. नगरपालिकेने यापूर्वीच आंदोलनासाठी शहरातील इतर पर्यायी आणि मोकळ्या जागा सुचवल्या होत्या; मात्र रोहित पवार हे शिवतीर्थ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातच आंदोलन करण्यावर ठाम राहिले. या कायदेशीर नोटीसमुळे आता आंदोलनस्थळी पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
Source link
अशोक खरात प्रकरणाचा तपास आता वेगात!:उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील नियुक्ती, भोंदूची उलटगणती सुरू