![]()
स्त्रियांनीच सती काय जायचे? सतीचे देव्हारे पुरुष का माजवितात? कोण म्हणतो हा धर्म! ही तर एक अंधरुढी आहे. काय हे बाईचं जीणं, केवळ मरण! त्यांच्या जळण्याचा ना खेद, ना दु:ख. बाई जर मेली तर एक पुरुष सती जाणार नाही. तो पंधराव्या दिवशी बोहल्यावर चढेल.’ असे म्हणत त्यांनी सतीच्या चाली विरुध्द बंडाचा झेंडा उगारला होता. मात्र सुमारे ३०० वर्षांपूर्वी स्वत:चे मुलाचे दुर्गुण वधूच्या मातापित्यांना स्पष्टपणे सांगितल्याचे दिसते. हा त्यांचा दुर्मिळ गुण आजही सर्वांना बोध घेणारा वाटतो. मुलाच्या लग्नप्रसंगी मुलीच्या आई- वडीलांकडून सुतळीच्या तोड्याची सुध्दा अपेक्षा न करता मुलाचे लग्न करुन हुंडाबंदीचा उपक्रम राबविला. अहिल्यादेवींना एका उपवर मुलींचे वडील येऊन भेटले आणि त्यांच्या पायाशी स्पर्श करुन म्हणाले, ‘मातोश्री आम्ही गरीब आहोत, जो-तो हुंडा मागतो. मुलींच्या लग्नाची चिंता आहे.’ हे ऐकून अहिल्यादेवी ‘स्त्रीच्या कौतुकाची नुसती सोंगं. तिला देवी म्हणावं, लक्ष्मी म्हणावं, देवी आदि शक्ती म्हणावं आणि तिच्या गृह प्रवेशाचे पैसे घ्यावे. सोने, वस्तू, मानपान ओरबडावा हे कसले खेळ? नुसता खोटा देखावा. असे उद्गारल्या आणि त्यांनी त्वरीत कारभारी हरी मुकुंद यास बोलावून राज्यात हुंडाबंदीचा आदेश काढला. ^अहिल्यादेवींच्या काळात पुरुषप्रधान संस्कृती होती. तेथे स्त्रीला कसलेही स्थान, अधिकार नव्हते. तरीही अहिल्यादेवींनी स्त्री अस्मितेचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा हुंडा बंदी पुकारला आणि तो अंमलात आणला. ‘राज्यकाभार पुरुषांनीच का करावा? स्त्रीयांनी का करु नये? मी स्त्री असले तरी राज्यकारभार करण्यास समर्थ आहे.’ असे म्हणत त्यांनी पुरुषी अहंकाराला जागच्या जागी थंड केले. स्त्री अस्मियतेचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा ललकार पुकारला. अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्यांच्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम ! हरिभाऊ कोळेकर, साहित्यिक संस्कृतीच्या काळात महिलांना स्थान
Source link
अहिल्यादेवी स्त्री अस्मितेचा ललकार