![]()
येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात अधिक मास, उन्हाळी सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी दिवसभर भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. पहाटे पाच वाजल्यापासूनच मंगळवारी मुक्कामी असलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसर गजबजून गेले. दुपारी ऊन वाढत असल्यामुळे स्वामी भक्त सकाळी सकाळी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. श्री वटवृक्ष स्वामी मंदिर ते समाधी मठापर्यंत मुख्य रस्त्यावर स्वामीभक्त दिसत आहेत. दोन दिवसांत एक लाख पेक्षा जास्त भाविकांनी दर्शन घेतले. पुरुष व महिलांसाठी दोन स्वतंत्र रांगा होत्या. तासाभरात सुमारे चार ते पाच हजार भाविक दर्शन घेत होते. शाळांना सुट्टी असल्याने भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविक धार्मिक पर्यटनाचा कुटुंबासह लाभ घेत आहेत. भाविकांनी अक्कलकोट शहरात दर्शनासाठी गर्दी केली असून वटवृक्ष मंदिरासह समाधी मठ आणि चोळप्पा घर, राजेराय मठ आणि शिवपुरी, गुरुमंदिर आणि अन्नछत्र मंडळ परिसर या ठिकाणी गर्दी केली होती. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविक अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी केली होती. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंह भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळ परिसरात महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अन्नछत्र मंडळ परिसर भाविकांनी फुलून गेले होते. मंदिर प्रशासन व नगरपालिका व पोलिस प्रशासन गर्दी नियोजनासाठी सतत प्रयत्न करत होते. वाहनांना मंदिर परिसरात बंदी घातली असून शहरात पाच ठिकाणी पार्किंगची सोय केली आहे. मंदिर परिसरात बॅरेकेटिंग करून चारचाकी वाहन पार्किंगमध्ये सोडले जात होते, त्यामुळे वाहनांची वाहनांची कोंडी झाली नाही. हिंदू पंचांगानुसार दर ३ वर्षांनी येणाऱ्या अतिरिक्त महिन्याला अधिक मास (किंवा पुरुषोत्तम मास/धोंड्याचा महिना) म्हणतात. या महिन्यात केलेली उपासना, जप, तप आणि दान यांचे फळ अनेक पटीने मिळते. १७ मे ते १५ जून दरम्यान हा अधिक मास राहणार आहे. दोन रांगात मंदिरात दर्शनासाठी सोडले ^श्री स्वामी मंदिरात वाढती गर्दी लक्षात घेऊन भाविकांना स्त्री व पुरुष अशा दोन रांगात मंदिरात दर्शनासाठी सोडले जात आहे.गुरुमंदिरात स्वामीच्या मूळ पादुकांचे दर्शन भाविक घेत आहेत. महेश इंगळे, अध्यक्ष परिसर भाविकांनी फुलून गेला ^येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात हजारो भाविक महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी केली. अधिक मास व सलग सुट्टीमुळे अन्नछत्र मंडळ परिसर भाविकांनी फुलून गेले. -अमोलराजे भोसले, मुख्य कार्यकारी अध्यक्ष पार्किंगची सोय, ५ ठिकाणी व्यवस्था मैंदर्गी रोडवरून अन्नछत्र मंडळ प्रांगण, कमलाराजे चौक परिसर, मल्लिकार्जुन मंदिर बस स्थानक, समाधी मठ, हत्ती तलाव परिसर, विरक्त मठ परिसर आदी ठिकाणी वाहनांसाठी पार्किंग होते. सर्व पाचही पार्किंगवर व्यवस्था केली.
Source link
अधिक मास, उन्हाळी सुटीमुळे 2 दिवसांत 1 लाख स्वामीभक्त:अक्कलकोटला भक्तांच्या रांगा, अन्नछत्रात महाप्रसादासाठी गर्दी