![]()
ग्रामीण भागातील मुलींना शिक्ष ासाठी प्रोत्साहन देणाऱ्या राज्य परिवहन महामंड ळाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजनेला सिल्लोड आगारात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पासेस मिळण्याबाबत काही अडचण आल्यास विद्यार थिनींनी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आगारप्रमुख सतीश अंभोरे यांनी केले आहे. सिल्लोड बसस्था कावरून १२२४ व अजिंठा बसस्था कावरून ३५० पासेसचे वाटप करण्यात आले आहे. आपल्या मुला-मुलींनी चांगले शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र, ग्रामीण भागात उच्च माध्यमिक शाळा नसल्याने मुलींना गावाबाहेर पाठवावे लागते. अशा वेळी बिकट आर्थिक परिस्थ तीमुळे प्रवासाचा खर्च अनेक कुटुंबांना झेपत नाही. मात्र, अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेमुळे हा आर्थिक अडथळा दूर झाला आहे. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना ही मुलींच्या दृष्टीने महत्वाकांक्षी योजना आहे. त्याचबरोबर एस.टी.च्या वतीने आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर शाळांमध्ये जाऊन पासेसचे वितरण करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थीनींची रांगेत उभा राहण्याची समस्या व अमूल्य वेळ वाचला आहे. पास मिळण्याबाबत काही अडचण आल्यास आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात सुखद नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच, १५ ते २४ जून या दहा दिवसांच्या कालावधीत ५ वी ते १२ वीत शिकणाऱ्या १५७४ विद्यार्थिनींना तीन महिन्यांच्या मुदतीचे मोफत पास वितरित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यंदा विद्यार्थिनींना पाससाठी आगारांमध्ये जाऊन कोणत्याही रांगेत उभे राहावे लागले नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी थेट संबंधित शाळांमध्ये जाऊन पास दिल्याने विद्यार्थिनींचा वेळ वाचला असून शैक्षणिक वर्षाची सुरुवात सुखद झाली आहे.
Source link
अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना:सिल्लोड आगाराच्या वतीने 1574 विद्यार्थिनींना मोफत पासचे वाटप