![]()
शिक्षणात गुणवत्ता हाच प्रगतीचा खरा पाया आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत आपला वेगळा ठसा उमटवला असून हे यश प्राचार्य, शाखाप्रमुख, गुणवंत शिक्षक आणि रयत सेवकांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे म्हणून गुणवंता
.
बैठकीपूर्वी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे आणि सहायक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी यांनी केले. प्रास्ताविक नवनाथ बोडखे यांनी केले. ते म्हणाले, गुणवत्ता हा एकमेव आजच्या स्पर्धेचा मापदंड समोर ठेवून विभाग चेअरमन व विभागीय व्यवस्थापन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत आहे. गुणवत्तेमुळेच विद्यार्थी संख्या वाढत आहे. शिक्षकांची पदे रिक्त असतानाही शैक्षणिक कामकाजाचा अतिरिक्त भार शाखाप्रमुख व शिक्षक सहन करत आहेत. विभागातील प्रत्येक वर्ग खोलीमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड बसवण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.
उत्तर विभागातील ज्या शाखांनी शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा गुणवंत शाखांचा सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शिक्षक यांचाही गुणगौरव करण्यात आला. विभागीय गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर यांच्यासह व गुणवंत शिक्षकांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू, बाबासाहेब भोस, कुंडलिक दरेकर, ज्ञानदेव पांडुळे, अनिल साळुंखे, प्रा. ए. टी. पोकळे उपस्थित होते. सुधीर साबळे आणि मंजूश्री धीवर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेतील अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.