![]()
आदर्श महिला नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 400 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अंबादास मानकापे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता बँक कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांतून जिनिंग खरेदी केल्याप्रकरणी मानकापे यांच्यावर सातवा गुन्हा दाखल झाला आहे. फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव येथील गाडेकर जिनिंगच्या खरेदी व्यवहारात ही फसवणूक झाली असून, यात मानकापेंसह त्यांच्या बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि सुनील पाटील, कॅनडा बँकेचे तत्कालीन अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. निवृत्त प्राध्यापिका जयश्री विष्णू गाडेकर (71) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली. गाडेकर आणि त्यांच्या कुटुंबाची डोंगरगाव कवाड (ता. फुलंब्री) येथे ‘गाडेकर जिनिंग अँड प्रेसिंग’ नावाची संस्था होती. या जिनिंगवर जालना रोडवरील कॅनरा बँकेचे 1 कोटी 90 लाखांचे कर्ज थकीत होते. कर्जवसुलीसाठी बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केल्यावर 2019 मध्ये गाडेकर कुटुंबाने ही जिनिंग विक्रीला काढली. मानकापे आणि सुनील पाटील यांच्यासोबत या जागेचा व्यवहार 7 कोटी रुपयांना ठरला होता. त्यावेळी या जागेची शासकीय किंमत 6 कोटी 56 लाख रुपये होती. स्टॅम्प ड्यूटी भरण्याचा आदेश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाने असताना, दस्त नोंदणी मात्र ‘आदर्श जिनिंग अँड प्रेसिंग’ या भागीदारी संस्थेच्या नावाने केली. ‘आरओसी’कडे कोणतीही नोंदणी न करता हा बेकायदा व्यवहार करण्यात आला. 7 कोटींची जमीन संगनमताने 2.11 कोटीत खरेदी केली 7 कोटींचा व्यवहार इतर बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून ‘आदर्श जिनिंग अँड प्रेसिंग प्रा. लि.’च्या नावाने सेल सर्टिफिकेट मिळवले. साडेसहा कोटींहून अधिक मूल्याची ही मालमत्ता बँकेकडून केवळ 2.11 कोटींत खरेदी केली.
Source link
‘आदर्श’च्या अंबादास मानकापेंवर 6 वा गुन्हा:कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीतून जिनिंगची खरेदी, स्टॅम्प ड्युटीतही फसवणूक, अन्य बँकेच्या अधिकाऱ्यासह तिघांवरही आरोप