Headlines

संचेती कॉलेजला फिजिओथेरपी क्षेत्रातील तीन राष्ट्रीय पुरस्कार:‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’, ‘टेक्नोलॉजी इंटीग्रेटेड सेंटर’ आणि ‘विशेष ऑर्थोपेडिक पुनर्वसन केंद्रा’चा गौरव




संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट्स (आयएपी) एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६मध्ये तीन प्रतिष्ठित पुरस्कार पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे झालेल्या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले अशी माहिती संचेती हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. पराग संचेती यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीला ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार मिळाला. तर संस्थेच्या संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनला ‘टेक्नोलॉजी इंटीग्रेटेड सेंटर’ आणि ‘स्पेशलाइज्ड ऑर्थोपेडिक रिहॅबिलिटेशन सेंटर’ हे दोन पुरस्कार मिळाले. आयएपीचे अध्यक्ष डॉ. संजीव झा यांच्या हस्ते संचेती हेल्थकेअर अकॅडमीच्या अध्यक्ष मनीषा संघवी आणि प्राचार्या डॉ. राधा भट्टड यांनी पुरस्कार स्वीकारले. फिजिओथेरपी शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता, वैद्यकीय क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि संशोधनातील योगदानाची दखल घेऊन आयएपीकडून हे पुरस्कार दिले जातात. डॉ. के. एच. संचेती यांच्या पुढाकारातून १९९५मध्ये स्थापन झालेल्या संचेती कॉलेजला नॅक मान्यता असून, येथे फिजिओथेरपी पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभव देण्यावर संस्थेचा भर आहे. विविध रुग्णालयांतील प्रशिक्षणासोबत आधुनिक पुनर्वसन तंत्रज्ञान, संशोधन, राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमधील सहभाग आणि अत्याधुनिक उपचारपद्धतींचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. या यशाबद्दल मनीषा संघवी यांनी सांगितले की, हे पुरस्कार संस्थेच्या शैक्षणिक दृष्टिकोनाची महत्त्वपूर्ण मान्यता आहे. सखोल वैद्यकीय प्रशिक्षण, उपचारांच्या परिणामांवर आधारित संशोधन आणि आधुनिक पुनर्वसनशास्त्राचा शिक्षणात समावेश या आधारावर संस्थेची वाटचाल सुरू आहे. या गौरवामुळे फिजिओथेरपी शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवेतील उत्कृष्टतेचे मानदंड अधिक उंचावण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *