Headlines

आदिवासी अस्मितेचा जागर; संस्कृतीचा जल्लोष‎:जिल्ह्यात ढोल-ताशांच्या निनादात शोभायात्रा; विविध उपक्रमांतून सामाजिक एकजुटीचे दर्शन‎



कर्मवीर भाऊसाहेब हिरे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी कळवण ते मानूर यादरम्यान तब्बल ५ किलोमीटर प्रभात फेरी काढली. या प्रभात फेरीत शाळेतील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते.

.

आदिवासी स्वातंत्र्य लढा आणि महान क्रांतीकारकांच्या इतिहासाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या प्रभात फेरीचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत, क्रांतीकारकांच्या घोषणा देत आणि आदिवासी संस्कृतीचे महत्त्व सांगत संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. कळवण ते मानूर असा ५ किलोमीटरचा टप्पा विद्यार्थ्यांनी शिस्तीत आणि उत्साहात पार पाडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि आपल्या संस्कृतीविषयी अभिमान दिसून आला. स्थानिक नागरिकांनीही या प्रभात फेरीचे जोरदार स्वागत केले. शाळेच्या शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

यावेळी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे पदाधिकारी, के. बी. एच. आश्रमशाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक के. एम. गातवे, मुख्याध्यापक डी. व्ही. अहिरे, एन. आर. गायकवाड, एम. के.निकम, ही. एन. आहेर, सी. जी. जाधव आदींसह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिनिधी | हरसूल येथे आदिवासी दिनानिमित्त डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत ढोल, संबळ, तारपा आणि पावरीच्या तालावर काढण्यात आलेल्या शोभायात्रेत आदिवासी संस्कृतीचा जागर करण्यात आला. वर्षानुवर्षे आदिवासी भागात बाळंतपणाची सेवा बजावणाऱ्या ज्येष्ठ सुईनी महिलांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. आदिवासी क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने डीजेमुक्त शोभायात्रा काढण्यात आली. यात तब्बल २० आदिवासी कलापथकांनी पारंपरिक लोककलेचा आविष्कार सादर केला. पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांच्या नृत्याने आणि वाद्यांच्या तालाने हरसूलचा परिसर दुमदुमून गेला. बिरसा मुंडा चौकात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार आला. सकाळी दहाच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले. बिरसा मुंडा चौकातून निघालेली शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मशीद चौक, हनुमान मंदिर, संताजी महाराज चौक मार्गे मुख्य रस्त्यावरून पुन्हा बिरसा मुंडा चौकात आली. विविध भागांतून आलेल्या कलापथकांनी पारंपरिक आदिवासी नृत्ये सादर केली. ढोल-संबळच्या तालावर कलाकारांनी धरलेला ठेका आणि पारंपरिक नृत्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला-गुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हरसूल पोलिस आणि आयोजन समितीच्या स्वयंसेवकांनी चोख बंदोबस्त ठेवला. परिसरातील सामाजिक संस्थांच्या वतीने सहभागी नागरिकांसाठी चहा, पाणी व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. आदिवासी दिनाचा उत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्य व्यासपीठावर हरसूल व परिसरात कला, क्रीडा, सामाजिक कार्य, आरोग्य यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१ मान्यवरांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

गौराई : चिंचवड, सापतपाली, तारपा : नेहाळे बुद्रुक, बिलदरी, मोरगा : जव्हार, ढोल : घनशेत, धानपाडा, बुरुडपाडा, हटीपाडा, होडी : जातेगाव, पावरी : कळवण, डेरा : आडगाव, तूर मादोळ : तेरीचिखली, मोरचोडा, डाक भक्ती : कुळवं, मोर पथक : खडकी, भोवाडा : दलपतपूर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *