![]()
आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या ५ हजार लिटर क्षमतेच्या ४७ एचडीपीई पाण्याच्या टाक्यांचे मंगळवारी (दि. १२) आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. येथील पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात चांदवड तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमधील विविध आदिवासी वाड्या-वस्त्यांसाठी या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावागावांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सहाय्यक गटविकास अधिकारी छोटू थोरात, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, योगेश ढोमसे, विजय धाकराव, शांताराम भवर, अशोक व्यवहारे आदींसह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील विविध गावांचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते. चांदवडमध्ये ५ हजार लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या वितरणप्रसंगी आमदार डॉ. राहुल आहेर, गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे व पदाधिकारी. महिलांची पायपीट थांबणार आदिवासी वाड्या-वस्त्यां वरील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते तर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. मात्र, ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध झालेल्या या टाक्यांमुळे पिण्याच्या पाण्याची साठवण होणार असल्याने महिलांची पायपीट थांबणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Source link
आदिवासी वाड्या-वस्त्यांवर 47 पाणी टाक्यांचे वितरण:चांदवडमध्ये टंचाईवर मात करण्यासाठी उपक्रम; 5 हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या