![]()
कथित ऑडिओ क्लिप आणि राजकीय षड्यंत्राच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. ‘आमच्याकडे आणखी पुरावे असून, आम्हाला पुढचे पाऊल उचलायला भाग पाडू नका,’ असा सज्जड दम त्यांनी भरला आहे. तसेच, भाजपच्या पडद्यामागच्या राजकारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, एका मोठ्या नेटवर्कमधील महिलेच्या दाव्यामुळे झालेले नुकसान ते खपवून घेणार नाहीत, असा मोठा दावा जरांगे यांनी केला आहे. मराठा समाजाने हे सत्य उघडकीस आणून शिंदेंची बदनामी टाळली असल्याने, त्यांनी समाजाचे आभार मानावेत, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला खोटं म्हणणार? म्हणजे तुम्ही खरे आहात का? काय नीतिमत्ता कोणत्या स्टेपला आणून ठेवली तुम्ही राजकारणाची? तुम्ही तेच खरे, तुमची सत्ता तीच खरी आणि तुमचे मंत्री तेच खरं आणि जनता बोलतेय हे खोटं? किती नीच नीतिमत्तेवरती वागायला लागलात तुम्ही या मतदान करणाऱ्या लोकांशी. यांच्यावर अन्याय, मतदान करणाऱ्या लोकांवरतीच अन्याय करणार तुम्ही. हे नाही सहन होत आता. याचा आम्ही 100 टक्के फडशा पाडणार आहे. तुम्ही किती खोटं ठरवितात बघतो ना आमच्याजवळ आणखीन पण आहे. बघू तुम्ही काय काय खोटं खोटं म्हणताय ते. त्याच्यात नाही टिकत मग तुम्ही. हे पण पुढचं सांगतो. तुम्ही याचाच छडा लावा. आम्हाला पुढचं पाऊल उचलायला लावू नका, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे. शिंदे साहेब काय यांना सोडत नाहीत पाटील तुम्ही पुढे वकिलांचा सल्ला घेताय म्हणजे उद्या जर सरकारचं असं तुम्हाला दडपशाही वृत्ती दिसायला लागली तर तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे म्हणाले की, हे बघा… हे देतीलच न्याय ही आम्हाला अपेक्षा आहे कारण कशावरनं सांगतो, हे पण सांगतो. शिंदे साहेब काय यांना सोडत नाहीत असं आम्हाला वाटतं. का? की राजकीय प्रतिष्ठेपेक्षा त्यांना वैयक्तिक स्टेटस टिकवणं गरजेचं आहे. आता वैयक्तिक प्रतिष्ठा त्यांची टिकवणं गरजेची आहे. त्यांच्या शिंदे घराण्याची म्हणा किंवा शिवसेनेची प्रतिष्ठा म्हणा. कारण हे सगळे आमदार, मंत्री पणाला लागतील यांच्या भाजपच्या पाठीमागच्या प्लॅनिंगमुळं. जी की प्लॅनिंग फडणवीस साहेबांना माहित नाही, अशी सध्या चर्चा आहे. मग यांच्यामुळे यांचं राजकीय करिअर पणाला लागलंय. मग ते काय सोडत नाहीत कारण त्यांनी पैसे घेतले नाहीत म्हणल्यावर ते सोडत नाहीत. पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ती बाई म्हणालीच कसं काय? आणि आम्हाला ही पण माहिती मिळतीये की ती बाई पण लहान नाहीये. ती पण मोठ्या नेटवर्कमधली आहे. ती पण खोटं बोलणार नाहीये. असं म्हणतात, अशी चर्चा आहे. मग आता शिंदे साहेबांनी जर घेतले नाहीत, तर शिंदे साहेब काय आता सोडत नाहीत तिला. तिच्यामुळे यांना शिंदे साहेबाला डॅमेज बसलाय. बदनामी… उलट आमच्या समाजाचे त्यांनी मराठ्यांचे पाय धुऊन प्यायले पाहिजे की आम्ही बाहेर काढलं ते. त्यांची प्रतिष्ठा वाचवली. त्यांनी आभार मानले पाहिजेत आमचे. ‘आता ते त्यांच्या त्यांच्यात वाचवायचा प्रयत्न करायला लागलेत’ मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही उघडं पाडलं नसतं तर आणखीन किती मागे यांनी प्लॅन रचलेत. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि भाजपने जर दिले असले तर ते बी गप बसत नाहीत आतून. आतूनही प्रचंड खदखद राहणार आहे. फक्त आता ते आम्हाला दिसावं जनतेला म्हणून ते फक्त म्हणणार आहेत, आरोप-प्रत्यारोप बंद करा, आपल्या आपल्यातच भांडणं खेळू नका, आपल्या आपल्यात शह देऊ नका, तिसऱ्याचा लाभ होईल. म्हणजे तिसऱ्याचा लाभ नाही करायचा तुम्हाला जनतेचा… खरं बाहेर काढून. याच्यासाठी लोकांनी मतं केलेत तुम्हालाय़ आता ते त्यांच्या त्यांच्यात वाचवायचा प्रयत्न करायला लागलेत. याच्यासाठी प्रचंड धडपड सुरू आहे, धावपळ सुरू आहे त्यांची. पण हे सगळं खरं आहे आणि हे उघडं पडलं पाहिजे. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा, आता त्यांचा सुद्धा कस लागणार आहे. कारण हे सोपं नाही. त्यांना त्यांच्याच लोकांच्या विरोधात… महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगतो, सत्ताधाऱ्यांना पण सांगतो आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांना पण सांगतो… त्यांच्या त्यांच्यात लढायचंय आता फडणवीस साहेबांना. आता महाराष्ट्र बघणार आहे. त्यांच्या लोकांच्या, चुकीच्या लोकांच्या विरोधात फडणवीस साहेब लढतेत का? आणि ते जर चुकीच्या लोकांच्या विरोधात त्यांच्या असून पण लढणार असले तर ते खमक्या माणूस. नसता हे फडणवीस साहेब सुद्धा हे जे पडद्याच्या पाठीमागून हे लोकं असे प्लॅनिंग करतेत. हे त्यांच्या दबावात, दबावाखाली येऊन त्यांनी त्यांना शिक्षा दिली नाही, असा संदेश फडणवीस साहेबांच्या बद्दल सुद्धा जाणार आहे. तुम्हाला वाटतंय आता हे तटस्थपणे सगळं चौकशी होईल. त्याचा फॉलोअप तुम्ही घेत राहणार का? यावर मनोज जरांगे म्हणाले, यंत्रणा त्यांच्या हातात आहे. आम्हाला फॉलोअप घेऊन देतेत, नाही देतेत, माहीत नाही. पण यंत्रणा त्यांच्या हातात आहेत, लोकं त्यांची आहेत आणि सत्ता त्यांची आहे. हे खरं बाहेर येऊ देणार नाहीत कारण ते दोन्ही संपणार आहेत मग याच्यात. हे गोरगरीब जनतेला कळालंय की हे दोन्ही संपणार आहेत यांच्या चुका आहेत. हे बाहेर येऊ द्यायचं नाही. पण मला वाटतंय सत्तेपेक्षा जास्त प्रतिष्ठा ते स्वतःच्या वैयक्तिक अस्तित्वाला देतील. आणि महाराष्ट्रातल्या जनतेची मनं जिंकवतील. असा आम्हाला फडणवीस साहेबाबद्दल आणि शिंदे साहेबाबद्दल 100 टक्के वाटतंय आणि आम्ही त्या अपेक्षेत धरून आहोत. ‘किती गलिच्छ विचाराचे लोकं आहेत हे’ मनोज जरांगे म्हणाले, मी सांगतो, यांनी जर हे खरं ठरवलं ना, त्यांना आयुष्यात फटका बसत नाही. मराठे तुटून त्यांच्या मागे राहणार. नसता सगळा मराठा समाज तुटणार आहे. कारण सगळ्यांना कळतंय. प्रत्येकानं त्या क्लिप… मराठा समाजाला पण सांगतो. त्या क्लिप खूप वेळेस ऐका. तुम्हाला कळल किती गलिच्छ विचाराचे लोकं आहेत हे. किती नीच विचाराचे लोकं आहेत हे. एकदा ऐकू नका. त्याचा शब्द न शब्द ऐका. किती मला त्रास देण्यासाठी, माझ्या मराठा समाजाला त्रास देण्यासाठी किती भयंकर क्लिप त्यांनी प्लॅनिंग पडद्याच्या मागे केली. याच्यातून सगळ्या पक्षातला मराठा समाज सुद्धा खरबडून जागा झालेला आहे. नेते सुद्धा. हे लहान विषय नाहीये, याला सहज मराठा समाजाने घेऊ नका. ते गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, ते गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत. ‘एआय’ (AI) आहे म्हणण्याचा प्रयत्न करतायत. आपण विश्वास ठेवू नका. आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवला ना, त्यांना मग हेच कळालंय… आपण प्लॅनिंग करायची, फक्त गैरसमज पसरायची, ‘एआय’ म्हणायची, खोटी म्हणायची. लोकं विश्वास ठेवतेत. आपल्याला येड्यात समजतेत ते येडं आणि येड्यात काढतेत हे मराठा समाजाने समजून घ्या. आपल्या समाजाने, आपलेच आपण माणसं आंदोलक खरे समजा एकमेकाला. खोटं करायला कोणाला हाव नाहीये. हे प्युअर खरंय. आणि त्यांच्या एका शब्दावरूनच कळालंय की हे खरंय. किती खोटारडे आहेत ते? झाडं तेच लावितात आता त्या भीमाशंकरचा बघा तेच तोडीत्यात. आत्महत्या कोणाच्या असल्या तरी त्या खोट्याच म्हणत्यात. योजना कुणीकडे राबित्यात… त्यांच्यात भ्रष्टाचारी असून सुद्धा नाही म्हणून ते सत्तेत घेतेत. नाही म्हणतेत आणि त्यांच्यात नसला की भ्रष्टाचारी हे म्हणतेत. समाजाने हे समजून घ्या. अवघड परिस्थितीये. आपल्या बाजूनं कोणीच नाही. आपल्या लेकराबाळांच्या पाठीवरून हात फिरवायला आणि हे खरंय म्हणायला. त्यांचेच लेकरं वाचवतायत ते याच्यातून. हे समजून घ्या, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे. भीमाशंकरला भेट देणार का? भीमाशंकरला तुम्ही भेट देणार आहात का? यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, हो आता आम्ही ते भीमाशंकरला जाणार आहोत. तिकडून बऱ्याच लोकांचे फोन आले आहेत. शक्यतो उद्या जाण्याची शक्यता आहे. कारण इकडं बीड जिल्ह्यात पण एक-दोन भेटी देऊन जर ते अॅडजस्ट होत असलं तर… उद्या भेट देऊन आम्ही आम्हाला इकडेच उशीर होईल तर तिकडं कर्जतकडं म्हणजे त्या भीमाशंकरकडं मुक्कामी जाऊन सकाळी पत्रकाराला जाता येईल असं चाललंय नियोजन. एका दिवसात थोड्या वेळात, अर्ध्या-एका घंट्यात तुम्हाला समजून देईल. पण जाण्याची शक्यता आहेच कारण तिकडच्या त्या गावाच्या लोकांचे पण खूप फोन आलेत की आपण याचं. आणि आम्ही त्या लोकांच्या पाठीशी, त्यांनी काळजी करायची गरज नाही. असले षड्यंत्र आपल्याला मोडून टाकावीच लागणार मनोज जरांगे म्हणाले, असले षड्यंत्र आपल्याला मोडून टाकावीच लागणार आहेत. जातीच्या पलीकडे जावं लागणार आहे. कुणी कुणाला, अशा प्लॅनिंगच्या बद्दल… पडद्यामागच्या प्लॅनिंगच्या बद्दल कोणी कोणाला ओबीसी समजू नये. कोणी कोणाला मराठा समजू नये. कोणी कोणाला दलित-मुस्लिम समजू नये. कोणी कोणाला वेगळं पाडून घेण्याची गरज नाही. कारण असली प्लॅनिंग कोणाच्याही संदर्भात होऊ शकते. अशी प्लॅनिंग कधी ओबीसींच्या नेत्यांच्या, सामाजिक काम करणाऱ्यांच्या, आंदोलकांच्या बद्दल जर झाली तर सगळ्यात अगोदर मनोज जरांगेच धावून येईल, हे सुद्धा तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो. कारण मुडदे राजकारण्यांचे पडणार नाहीयेत. त्यांचा लॉस होणार नाहीये. लॉस आपल्या गोरगरीब जनतेचा होणार आहे. आरक्षणाच्या लढाईच्या टाईमाला तुम्ही तुमचा लढा तुम्हाला लढायचा, तर आमचा आम्ही लढू. मी हे स्वच्छपणानं सांगतोय. ज्या-ज्या वेळेस आरक्षणाचा किंवा अनेक वेगळा विषय येईल… तुमच्या अस्तित्वाचा, आमच्या पण अस्तित्वाचा, मी जातीतूनच लढणार हे ठामपणानं सांगतो. त्यावेळेस तुम्हाला लढायचं तर लढा. ती आपली वैचारिक लढाई आहे. परंतु अशी प्लॅनिंग जर या विरोधी पक्षांच्या बद्दल होत असली, मराठ्यांच्या आंदोलनाबद्दल होत असल्या, ओबीसींच्या आंदोलनाबद्दल होणार असल्या, दलित-मुस्लिमांबद्दल होणार असल्या, सत्ताधाऱ्यांतल्याच काही मित्रपक्षांबद्दल होणार असल्या, तर इथं सावध होणं नोकरदारापासून, व्यवसायिकापासून सगळ्यांनी होणं गरजेचं आहे. म्हणून मी प्रामाणिकपणानं सांगतो, असल्या विषयात ओबीसी मराठा असो, किंवा दलित मुस्लिम असो, किंवा तो हिंदू असो किंवा कोणत्याही प्रकारचा असो, आपण एकजीवानं… नीच प्रवृत्तीची जी लोकं आहेत ही विषारी, पडद्यामागून प्लॅनिंग करून आपल्याला संपवतायत अशाविरुद्ध एकजीवानं लढणं आपण शिकलं पाहिजे, असे आवाहन मनोज जरा यांनी केले आहे. मी सोडत नसतो तुम्हाला आमचं मराठ्यांचं आंदोलन मोडवण्याचं कारण काय? मला बदनाम करायचं यांचं कारण काय? माझ्या लेकराबाळांचं मराठ्यांच्या आयुष्याचं राखरांगोळी करायचा यांचा उद्देश काय? आमचे लोक, आमचा मराठा समाजाचा उन्हाळा व्हावा, त्यांचे उन्हात घरं होरपळावेत असं स्वप्न या हरामखोर लोकांनी का बघितलं? यांना आम्ही सुट्टी देणार नाहीयेत आता. तुम्हाला कोणची ताकद वापरा, तुम्हाला एकच संकेत मी दिलाय की तुमच्या सगळ्या यंत्रणेचं कंबरडं मोडण्याची ताकद मराठ्यांच्या पोरांनी ठेवलेलीये. जिथं काहीच मिळत नाही, पडदा फाडून पडद्याच्या मागचं जाळ्यातून आणलंय. हे तर एक संकेत आम्ही तुम्हाला दिलाय. मग तुमचं माझ्याजवळ काय काय नसल? साध्या लोकांचं. हे पण लक्षात ठेवा. फक्त तीन वर्षे मी माझ्या मराठा समाजासाठी त्रास सहन केलेला आहे. वेदना सहन केलेल्या आहेत. मी आता पुरा बदला घेणार आहे. मी सोडत नाही तुम्हाला आता, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मोठा गेम झाला, मग याचा अर्थ महाराष्ट्राला कळतो सुशील कुलकर्णींच्या वाक्याचा तुम्ही वारंवार उल्लेख केलाय की गेम झालाय… मोठा गेम झालाय. सुशील कुलकर्णींना जर असं वाटतंय की मोठा गेम झालाय, तर मग ते स्वतःच या क्लिपची चौकशी करा अशी मागणी का करत नाहीयेत? यावर उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की माझा गेम झाला, मोठा गेम झाला आणि मग याचा अर्थ महाराष्ट्राला कळतो. त्यांनी केली चर्चा आणि त्यांनाच पाच-सात जणांना माहित होती. आणि ती बाहेर गेली, त्याचा अर्थ असा आहे आपल्यातला कोण गद्दार झाला? आपला मोठा गेम झालाय. पण पुढं म्हणता येईना, पण याचा छडा फडणवीस साहेब-शिंदे साहेब लावतील. हे प्रकरण वेगळं आहे आणि आरक्षण विषय वेगळा आहे. त्याच्यात कायम माझं अन् त्यांचं लागलेलं राहणार आहे, पण हा विषय त्यांच्या सुद्धा अस्तित्वाचा आहे आणि मराठ्यांच्या सुद्धा अस्तित्वाचा आहे. याच्यात त्यांनी सुट्टी देऊ नये. आणि राजकीय करिअर फडणवीस साहेबांचं सुद्धा पणाला लागलेलं आहे, हे फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावं. तुमच्या परस्पर असेल, तर तुम्ही यांचा आता मुडदाच पाडला पाहिजे. यांना सोडलं नाही पाहिजे आणि तुम्ही जर यांना खोटं खोटं म्हणून पक्ष आणि तुमचे लोकं वाचवण्याचा फडणवीस साहेब प्रयत्न केला, की याच्यात तुम्हीच आहेत हे सिद्ध होणार आहे, असे जरांगे यांनी म्हटले.
Source link
'आमच्याकडे आणखी पुरावे, पुढचे पाऊल उचलायला भाग पाडू नका':मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले- आता सहन होत नाही