Headlines

आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी पाच हजार पुणेकर सायकल रॅलीत सहभागी:मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'पुणे ऑन पेडल्स'चे आयोजन; 150 गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘पुणे ऑन पेडल्स’ सायकल रॅली आणि ‘पुणे फॅमिली वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले. राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्राने हा उपक्रम राबवला. फिट इंडिया आणि प्रदूषणमुक्त पुण्याचा संदेश देण्यासाठी सुमारे पाच हजार पुणेकर यात सहभागी झाले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिर येथून निघून कर्वे रोडमार्गे डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते पुन्हा बालशिक्षण मंदिर येथे संपली. या रॅलीच्या निमित्ताने १५० गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटण्यात आल्या. रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक जयंत भावे आणि विश्राम कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये गिर्यारोहक गणेश आगाशे, खोखो प्रशिक्षक पुष्कर बर्वे, खोखो पुरस्कार विजेती राखी बर्वे, आयर्नमन स्पर्धा विजेते कुणाल आणि मीनल काशीकर, निवृत्त पोलीस अधिकारी विष्णु ताम्हाणे, क्लायंबर रुद्र करंदीकर व किया रेवणकर, क्रीडा छायाचित्रकार नितीन खानोलकर आणि अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेतील विजेते प्रशांत व मेधा जोग यांचा समावेश होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी आपले विचार मांडले. ते म्हणाले, विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे. ‘फिट इंडिया’च्या माध्यमातून नागरिकांनी आरोग्य आणि तंदुरुस्तीला महत्त्व द्यावे. तसेच, पर्यावरण जपण्यासाठीही सक्रिय सहभाग नोंदवावा. देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांवर भर देतानाच, येत्या काळात सायकल प्लॅनद्वारे सायकल संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सामान्य नागरिक व महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कटिबद्ध आहेत. प्रास्ताविकात प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘पुणे ऑन पेडल’ सायकल रॅलीचे हे सातवे वर्ष आहे. आरोग्यपूर्ण जीवन आणि प्रदूषणमुक्त पुण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय घेऊन पंतप्रधान काम करत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *