Headlines

आलियाबादऐवजी अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागामध्येच ‘जीएमसी’ व्हावे:आमदार संजय खोडके यांची पुन्हा एकदा मागणी‎




येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे आलियाबाद येथील प्रस्तावित जागा वन विभागाच्या अखत्यारीतील ‘आयडेंटीफाईड फॉरेस्ट’ क्षेत्रात येत असल्याने कायदेशीर व तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही जागा बदलून शहराच्या मध्यवर्ती भागातील पर्यायी जागांचा विचार करावा, अशी मागणी विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी सभागृहात केली. आमदार खोडके म्हणाले की, जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालय परिसरातील २३ एकर जागा, पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या वेलकम पॉईंट परिसरातील २५ एकर जागा, मौजे रहाटगाव (सर्व्हे क्र. १२१) येथील २३ एकर जागा तसेच कापूस पणन महासंघ (मोसीकॉल) परिसरातील २५ एकर जागेचा समावेश आहे. आशियाई विकास बँकेच्या ‘एन्व्हायर्नमेंट इकोसेफगार्ड’ सर्वेक्षणात आलियाबाद येथील प्रस्तावित जागा ‘आयडेंटीफाईड फॉरेस्ट’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार व ‘वन (संरक्षण व संवर्धन) अधिनियम, १९८०’ अंतर्गत केंद्र शासनाच्या पूर्व मंजुरीशिवाय कोणतेही वनेत्तर काम करता येणार नाही. त्यामुळे प्रकल्पास आणखी विलंब होण्याची शक्यता असून, शहरापासून सुमारे १२ किलोमीटर दूर असलेल्या रुग्णालयाचा सर्वसामान्य रुग्णांना अपेक्षित लाभ मिळणेही कठीण ठरेल, असे त्यांनी नमूद केले. ६०० ते ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची उपयुक्तता अबाधित राहण्यासाठी जागेचा फेरविचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. खोडके यांनी सूचवलेल्या पर्यायी जागांचाच विचार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, एडीबीच्या सर्वेक्षणात आलियाबाद येथील जागा वन विभागाच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या मंजुरीशिवाय तेथे वनेत्तर काम करता येणार नाही. यासाठी वन मंत्रालयाच्या संबधित पोर्टलवर प्रस्ताव सादर करण्यात आला असून आवश्यक परवानगी मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. जागा उपलब्ध न झाल्यास आमदार संजय खोडके यांनी सुचविलेल्या शहरातील पर्यायी जागांचा विचार करण्यात येईल, असे वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले. बच्चू कडू यांनी सभागृहात बोलताना सांगितले की, अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रस्तावित असलेल्या रुग्णालयांच्या अंतराबाबत आणि उपलब्ध जागांबाबत वस्तुस्थिती वेगळी आहे. सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय ही सर्व अवघ्या १५-१५ मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत. मात्र जे वैद्यकीय महाविद्यालय वापरण्यात येणार आहे, ते तिथून तब्बल १२ ते १५ किलोमीटरवर अंतरावर आहे. मंत्री महोदय, वारंवार ‘मुख्यमंत्री समिती’चे नाव सांगून आम्हाला धमकावत तर नाही ना? तुम्ही वस्तुस्थिती मान्य करून ही बाब मुख्यमंत्री समितीसमोर ठेवू, असे स्पष्ट आश्वासन का देत नाही? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *