Headlines

आळेफाटा परिसरातून गावरान जांभळाची झाडे झाली गायब:झाडांचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून पडला




आळेफाटा | उन्हाळा सुरू झाला की गावोगावी रस्त्यांच्या कडेला आणि शिवारात काळ्याभोर गावरान जांभळांनी लगडलेली झाडे अन् त्याखाली शाळकरी मुलांची होणारी गर्दी… हे सुखावणारं चित्र आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. नागरीकरण, शेतीचा विस्तार आणि रस्ते रुंदीकरणात झालेली बेसुमार वृक्षतोड यांमुळे आळेफाटा परिसरातून जांभळाची जुनी झाडे झपाट्याने नष्ट झाली आहेत. नव्या लागवडीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आता गावरान जांभळे बाजारात शोधण्याची वेळ आली आहे. यंदा या फळाला निसर्गाच्या लहरीपणाचाही मोठा फटका बसला आहे. कडक उन्हाळा, अवेळी पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे जांभळाच्या झाडांचा मोहर मोठ्या प्रमाणावर गळून पडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *