Headlines

इंधनावरील कार बुकिंग रद्द करून ईव्ही घेण्याकडे कल:इंधन दरवाढीमुळे इव्हीची मागणी 30 टक्क्यांनी वाढली




वाढती इंधन दरवाढ आणि आखाती देशांमधील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याची भीती, याचा थेट परिणाम वाहन खरेदीवर दिसतो आहे. डिझेल, पेट्रोलच्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांना नाशिककर पसंती देत आहेत. गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक कारची मागणी 15 टक्क्यांवरून 30 टक्क्यांवर पोहोचली आहे. ग्राहक पेट्रोल किंवा डिझेल कारचे बुकिंग रद्द करून इलेक्ट्रिक कारची खरेदी करण्याला पसंती देत आहे. केवळ कारच नव्हे, तर इलेक्ट्रिक स्कूटरच्या मागणीतही 35 टक्क्यांनी वाढली आहे. याचा परिणाम वाहनांच्या पुरवठ्यावर होऊन 4 ते 16 महिन्यांपर्यंतचे वेटींगही प्रत्येक मॉडेलला पहायला मिळत आहे. अमेरिका, इराण युद्धा इंधनाची टंचाई, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनामुळे इलेक्ट्रिक व्हेईकलच खरेदी करण्याचा ट्रेण्ड समोर आला आहे. ई व्हेईकलच्या मागणीत अचानक वाढ झाल्यामुळे पुरवठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. परिणामी, सध्या इलेक्ट्रिक कारसाठी 4 ते 16 आठवड्यांपर्यंत तर दुचाकींसाठी सरासरी 8 आठवड्यांचा ‘वेटिंग पिरीयड’ आहे. शहरात आणि महामार्गांवर वाढलेल्या चार्जिंग स्टेशन्सच्या उपलब्धतेमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ईव्ही आता खात्रीशीर पर्याय ठरत आहे. प्रत्येक मॉडेलला वेटींग इंधनाचा तुटवडा आणि वाढलेल्या किंमती, जुनपासून बंद होत असलेले अनुदान आणि पंतप्रधानांनी केलेले आवाहन या सगळ्या पार्श्वभुमीवर दोन महिन्यांपासून इलेक्ट्रीक स्कुटरच्या मागणीमध्ये किमान 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे प्रत्येक मॉडेलला दोन महिन्यांचे वेटिंग आहे. – जय पटवा, संचालक, पटवा ऑटो ड्राइव्ह मुबलक चार्जिंग स्टेशन्स महापालिकेसह विविध कंपन्यांचे डिलर्स, खासगी स्टेशन्समुळे चार्जिंग करणे सुलभ झाले आहे. महामार्गावरही चार्जिंग स्टेशन्स उभी राहिली आहेत. वाहनांना एका चार्जमध्ये 180 ते 500 किलोमिटरपर्यंतचे मायलेज मिळत आहे. टोल टॅक्सही माफ झाला असल्यानेही ईव्हीला बूस्ट मिळतो. 4 ते 16 आठवड्याचे वेटींग 15 ते 16 टक्के असलेली मागणी अचानक 30 टक्क्यांच्याही वर पोहोचल्याने पुरवठा आणि मागणी साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक मॉडेलला किमान चार ते कमाल सोळा आठवड्यांचे वेटिंग आहे. ग्राहक पेट्रोल-डिझेलचे बुकिंग रद्द करून ईव्हीला पसंती देत असल्याचेही चित्र अगदी खरे आहे. – पंकेश चंद्राद्रे, सीईओ, मॅक्स मोटर्स



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *