![]()
वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसने एल्गार पुकारात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आंदोलनात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत प्रतीकात्मक निषेध म्हणून “मेलोडी चॉकलेट’चे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा आणि चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे. गोरगरीब सामान्य जनतेला आज इंधन, अन्नधान्य, तेल जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करणे अशक्य झाले आहे. दरम्यान महागाई व इंधन, गॅस दरवाढीच्या विरोधात महिला काँग्रेसने आंदोलन केले. आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कशीश खान यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते. आंदोलनात ज्येष्ठ नेते डॉ. संजीवनी बिहाडे, जिल्हा कांग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तायडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गवई, माजी नगरसेवक मो. इरफान, विजय जामनिक, मंसूर खान, रेखा डोंगरे, ॲनी इंगळे, शहांना शेख, रंजना चवरे, कल्पना वासनिक, ज्योती डोंगरे, मंजू चवरे, सुचिता चवरे, अश्विनी चवरे, कुसूम चव्हाण, सीमा जपसरे, कल्पना सोनोने, जुबेदा बी आदींसह शेकडो महिलांचा सहभाग होता. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पंतप्रधान मोदी दुटप्पी वागत असल्याचाही केला आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जनतेला पेट्रोल- डिझेल, खाद्य तेल, खते बचतीचे आणि वर्क फ्रॉम होम, सोने चांदी खरेदी न करण्याचे आवाहन करतात, मात्र स्वतः ते आणि भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या रॅली आणि कार्यक्रम घेत उधळपट्टी करत आहेत. जनतेसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा नियम असून ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. सरकारविरोधात केली जोरदार घोषणाबाजी वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान घोषणा दिल्या. “अरे तेरे अच्छे दिन मोदी’, “सौ के पार पेट्रोल’, ‘सौ के पार डिझेल’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. वाढत्या इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले असून केंद्र सरकार महागाई नियंत्रणात आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
Source link
इंधन दरवाढीचा निषेध:महागाईविरोधात महिला काँग्रेसची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, "मेलाेडी चॉकलेट’ वाटप करत सरकारवर टीका