![]()
भातकुली तालुक्यातील उत्तमसरा येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना जंतांमुळे होणारे त्रास आणि त्यापासून बचावाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना जेवणानंतर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. जंतांचा प्रादुर्भाव झाल्यास मुलांना कुपोषण, रक्तक्षय आणि सतत थकवा जाणवू शकतो. त्याचा शारीरिक वाढ आणि मानसिक विकासावरही परिणाम होऊ शकतो, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. जंतांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अल्बेंडाझोलची गोळी वर्षातून दोनदा घेण्याचे आवाहन करण्यात आले. गोळी कशी घ्यावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. गोळ्यांचे वाटप शिक्षकांना करण्यात आले होते. कार्यक्रमाला समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सोनाली देशमुख, आरोग्य सेविका शारदा बारड आणि मंगला वानखेडे, आशा सेविका संगीता निंभोरकर आणि सुरेखा सवई, तसेच पीटीए सदस्या सविता शिंदे उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी इंगळे, शिक्षक राजेश सावरकर, प्रमोद कांबळे आणि गजानन येलोणे, अंगणवाडी सेविका जयश्री पेढेकर, वर्षा मानकर, अनुराधा भिंगारे आणि रुपाली बेलसरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काम केले.
Source link
उत्तमसरा शाळेत विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या दिल्या:राष्ट्रीय मोहिमेत अल्बेंडाझोलच्या वापराची माहिती; वर्षातून दोनदा गोळी घेण्याचे आवाहन