Headlines

नवरा-बायकोसह तिघांनी सराफाला 44.75 लाखांना लुटले:सोन्याचे दागिने बनवून देण्याचे आमिष, बीडमधील घटना




सोन्याचे आकर्षक दागिने बनवून देण्याचे आमिष दाखवून सराफा व्यावसायिकाची तब्बल 44 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात उघडकीस आला आहे. 30 तोळ्यांहून अधिक सोने घेऊन दागिने बनवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, सोने घेतल्यानंतर दागिने न देता आरोपींनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नवरा-बायकोसह तिघांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. विश्वास संपादन करून सोन्याची फसवणूक मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव शहरातील संभाजी महाराज चौक परिसरात कल्पतरू ज्वेलर्स हे सराफा दुकान आहे. या दुकानाचे संचालक रवि बालाप्रसाद मानधने यांनी या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सोन्याचे दागिने तयार करून देण्याच्या बहाण्याने आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दागिने बनवून देण्याचे आश्वासन देत 30 तोळ्यांहून अधिक सोने घेतल्याचा आरोप आहे. मात्र, ठरल्याप्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून न देता आरोपींनी सोने परत केले नाही. या व्यवहारातून सराफा व्यावसायिकाची 44 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दागिने बनवून देण्याच्या विश्वासावर दिलेल्या सोन्याचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवरा-बायकोसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल या प्रकरणात देबु नभोकुमार सासमल, त्याची पत्नी सुमित्रा सासमल आणि सोन्याचा कारागीर सुदीप डोलाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपी सध्या छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलीस ठाण्याजवळ राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा मूळ पत्ता पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. 25 ऑक्टोबरला घडला प्रकार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार ते पाचच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दागिने बनवून देण्याच्या व्यवहारातून सोन्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफा व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 370/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2), 318(4) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ सोन्याचे दर वाढलेले असताना मोठ्या प्रमाणात सोन्याचा व्यवहार करताना विश्वास आणि व्यवहारातील पारदर्शकता महत्त्वाची ठरते. अशा परिस्थितीत दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांच्या सोन्याची फसवणूक झाल्याच्या या घटनेने माजलगावमधील सराफा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात आरोपींनी नेमक्या कोणत्या पद्धतीने विश्वास संपादन केला, सोन्याचे काय केले आणि फसवणुकीत प्रत्येकाची भूमिका काय होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. हेही वाचा…. ‘2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं’:राज ठाकरेंचा फडणवीसांना मिश्कील टोला, एकाच मंचावर ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. सत्ताबदल, पक्षफुटी, आमदारांची फोडाफोडी आणि नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्याचे राजकारण सातत्याने चर्चेत राहिले आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघेही एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या मिश्कील विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ‘2029 सालापर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं,’ असे म्हणत राज ठाकरेंनी राजकीय परिस्थितीवर उपरोधिक भाष्य केले. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *